घरताज्या घडामोडीमध्य प्रदेशपाठोपाठ आता उत्तर प्रदेशमध्येही २५ डिसेंबरपासून Night Curfew, महाराष्ट्राचं काय?

मध्य प्रदेशपाठोपाठ आता उत्तर प्रदेशमध्येही २५ डिसेंबरपासून Night Curfew, महाराष्ट्राचं काय?

Subscribe

योगी सरकारने जाहीर केलेल्या आदेशानुसार, कुठल्याही कार्यक्रमाचे आयोजन करताना त्यात २००हून अधिक लोकांचा समावेश नसून,त्यांनी कोविड-१९च्या नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. या कार्यक्रमाचे आयोजन करणाऱ्यांनी स्थानिक प्रशासनाला कार्यक्रमाबाबत माहिती देणे गरजेचे आहे. भारतातील या दोन राज्यांत नाईट कर्फ्यू लागू करण्यात आला असून, महाराष्ट्र राज्यात ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर काय निर्णय घेणार, याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

नवी दिल्लीः देशात ओमिक्रॉनचा फैलाव मोठ्या प्रमाणात वाढत असून, मध्य प्रदेशपाठोपाठ आता ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशातील योगी सरकारनेही मोठा निर्णय घेतलाय. उत्तर प्रदेशमध्ये २५ डिसेंबरच्या रात्री ११ वाजल्यापासून ते पहाटे ५ वाजेपर्यंत नाईट कर्फ्यू लागू करण्यात येणार आहे. काल गुरुवारी २३ डिसेंबरलाही मध्य प्रदेशमध्ये ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर नाईट कर्फ्यू लागू करण्यात आला.आता मध्य प्रदेशपाठोपाठ आता उत्तर प्रदेशमध्येही ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर अनेक नियमावली जाहीर करण्यात आलीय. याशिवाय लग्नसराईचा काळ सुरु असल्यामुळे लग्नसमारंभात येणाऱ्यांची संख्या ही २०० पर्यंत ठरवण्यात आली आहे. योगी सरकारने जाहीर केलेल्या आदेशानुसार, कुठल्याही कार्यक्रमाचे आयोजन करताना त्यात २००हून अधिक लोकांचा समावेश नसून,त्यांनी कोविड-१९च्या नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. या कार्यक्रमाचे आयोजन करणाऱ्यांनी स्थानिक प्रशासनाला कार्यक्रमाबाबत माहिती देणे गरजेचे आहे. भारतातील या दोन राज्यांत नाईट कर्फ्यू लागू करण्यात आला असून, महाराष्ट्र राज्यात ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर काय निर्णय घेणार, याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

मास्क नाही तर ‘किराणा सामान’ मिळणार नाही

बाजारामध्ये नागरिकांनी जाताना मास्कचा वापर करणे अनिवार्य आहे. ‘मास्क नाही तर किराणा सामान द्यायचे नाही’ अशी सक्त ताकीद दुकानदारांनी देण्यात आली असून, ग्राहकांना विनामास्क खरेदी करता येणार नाही.

- Advertisement -

यूपीच्या बोर्डरवर होणार तपासणी

पब्लिक एड्रेस सिस्टम अधिक प्रभावी करण्यात येत आहे. देशाच्या कोणत्याही राज्यामधून किंवा विदेशातून येणाऱ्या नागरिकांची ट्रेसिंग-टेस्टिंग करण्यात येणार आहे. बस, रेल्वे आणि एअरपोर्टवर अधिक सतर्कता बाळगण्यात येत आहे.

यूपीमध्ये ३१ कोरोनाबाधित रुग्ण

उत्तर प्रदेशात कोरोनाची रुग्णसंख्या वाढत चालली आहे. अतिरिक्त मुख्य सचिव आरोग्य अमित मोहन प्रसाद यांनी गुरुवारी सांगितले की, गेल्या २४ तासांत राज्यात १.९१ लाखांहून अधिक नमुन्यांची चाचणी करण्यात आली आहे. यामध्ये ३१ नवीन रुग्ण आढळले आहेत. १२ जण बरे झाले आहेत. उत्तरप्रदेशात कोविड १९ च्या रुग्णांची संख्या २३६ इतकी झाली आहे.

- Advertisement -

मध्य प्रदेशात ओमिक्रॉनचा एकही रुग्ण नाही

विशेष म्हणजे मध्य प्रदेशमध्ये अद्यापपर्यंत ओमिक्रॉनचा एकही रुग्ण आढळलेला नाही. पण तरीही नाईट कर्फ्यू, लागू करणारे मध्य प्रदेश पहीले राज्य ठरले आहे. दरम्यान , मध्यप्रदेशमध्येही आंतरराष्ट्रीय प्रवासी दाखल होत असल्याने काही दिवसात ओमीक्रॉनचे रुग्णही आढळण्याची शक्यता आहे.


हे ही वाचा – Maharashtra Assembly Winter Session 2021: विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक २८ डिसेंबरला, अध्यक्षपदासाठी ‘या’ नावांची चर्चा

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -