घरट्रेंडिंगEarth Day 2020: ... म्हणून साजरा केला जातो जागतिक वसुंधरा दिन

Earth Day 2020: … म्हणून साजरा केला जातो जागतिक वसुंधरा दिन

Subscribe

पहिल्यांदा हा दिवस १९७० साली साजरा करण्यात आला होता.

दरवर्षी जगभरात जागतिक वसुंधरा दिन २२ एप्रिल रोजी साजरा केला जातो. सर्वात पहिल्यांदा हा दिवस १९७० साली साजरा करण्यात आला होता. जगातील प्राणी, वनस्पती आणि जीव-जंतू वाचवण्यासाठी तसेच जगभरातील लोकांमध्ये जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने २२ एप्रिल रोजी जागतिक वसुंधरा दिन साजरा करण्यात येतो. जागतिक वसुंधरा दिनाची सुरुवात पर्यावरणविषयक शिक्षण म्हणून अमेरिकन सिनेटर गेलोर्ड नेल्सन (Gaylord Nelson) यांनी केली. हा दिवस पहिल्यांदा १९७० मध्ये साजरा करण्यात आला, त्यानंतर झाली, त्यानंतर आज १९५ पेक्षा जास्त देश हा दिवस साजरा करतात.

- Advertisement -

१९६९ मध्ये कॅलिफोर्नियामधील सांता बार्बरामध्ये तेल गळतीमुळे मोठ्या प्रमाणात कचरा निर्माण झाला, त्यामुळे पृथ्वीचे बरेच नुकनास झाले. पर्यावरणाच्या झालेल्या या हानीबद्दल विचार करत अमेरिकी सिनेटर गेलॉर्ड नेल्सनने पर्यावरण संरक्षणाबद्दल काहीतरी करण्याचा निर्णय घेतला. २२ जानेवारी रोजी, तीन दशलक्ष गॅलन तेलाची समुद्रात गळती झाली. यामुळे दहा हजार सी-बर्ड्स, डॉल्फिन, सील आणि सी-लायन्स मृत्यूमुखी झाले. यामुळे २२ एप्रिल १९७० रोजी साधारण दोन कोटी अमेरिकन लोकांनी जागतिक वसुंधरा दिन पहिल्यांदा साजरा करण्यात आपला सहभाग घेतला होता.

जागतिक वसुंधरा दिन, ‘अर्थ डे हे शब्द लोकांपर्यंत पोहोचवणारा व्यक्ती ज्युलियन कोनिग (Julian Koenig) होता. त्याने या शब्दाची ओळख आणि दिवसाची गरज लोकांपर्यंत नेण्यास मदत केली. पर्यावरण संरक्षणाशी संबंधित ही चळवळ साजरी करण्यासाठी त्याने आपल्या जन्मदिवसाची २२ एप्रिल ही तारिख निवडली. तेव्हा पासून आजच्या दिवशी हा दिवस साजरा करण्यात येतो.

- Advertisement -

गुगलचे खास डूडल

 

जगभरात २२ एप्रिल हा वसुंधरा दिन म्हणून साजरा होतो. पृथ्वीवरील सजीव सृष्टीची नैसर्गिक भेट किती सुंदर असू शकते याची छोटीशी झलक अॅनिमेटेड डुडलमधून देत गुगलने देखील हा दिन साजरा केला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -