घरट्रेंडिंगपर्यटकांना बनवलं मुर्ख, गाढवाला दिला झेब्राचा रंग

पर्यटकांना बनवलं मुर्ख, गाढवाला दिला झेब्राचा रंग

Subscribe

'शेर की खाल में लोमडी' या म्हणीप्रमाणे 'झेब्राचा वेश घेतलेलं गाढवं', असा गमतीशीर प्रकार इजिप्तच्या एका प्राणी संग्रहालयात पाहिला मिळाला.

हा गमतीशीर प्रकार इजिप्तमधील एका प्राणी संग्राहलयात घडला असून, सध्या सोशल मीडियाद्वारे जगभरात हा धमाल किस्सा व्हायरल होतो आहे. इजिप्तमधील या प्राणी संग्रहालयात गेल्या काही दिवसांपासून, चक्क एका गाढवाला झेब्रा बनवून पिंजऱ्यामध्ये ठेवण्यात आलं होतं. झेब्रासारख्या काळ्या-पांढऱ्या पट्ट्या गाढवाच्या अंगावर रंगवण्यात आल्या आहेत. त्यामुळे मागील काही दिवसांपासून प्राणी संग्रहालयात झेब्राला पाहण्यासाठी आलेले पर्यटक चांगलेच मूर्ख बनत होते. हा धक्कादायक पण तितकाच गमतीशीर प्रकार इजिप्तमधील कैरो इथल्या आंतरराष्ट्रीय प्राणी संग्रहालयालात उघडकीला आला. एका विद्यार्थ्याने हा प्रकार सर्वांसमोर आणत झेब्राच्या रंगात रंगलेल्या गाढवाचा पर्दाफाश केला. सध्या सोशल मीडियामध्ये हा फोटो व्हायरल होत असून नेटिझन्सकडून याप्रकाराची जोरदार खिल्ली उडवली जात आहे.

zebra donkey Egypt
झेब्रा बनवलेल्या गाढवाची पोलखोल करणारा विद्यार्थी (सौजन्य-सोशल मीडिया)

नकली झेब्राची पोलखोल

कैरो इंटरनॅशनल प्राणी संग्रहालयाला भेट देण्यासाठी काही विद्यार्थ्यांचा ग्रुप त्याठिकाणी गेला होता. त्यावेळी या कथित झेब्राचे फोटो काढत असताना मोहम्मद सरहान या विद्यार्थ्याला काहीतरी गडबड असल्याचं जाणवलं. त्याने जवळून झेब्राचं निरिक्षण केल्यानंतर हा झेब्रा नसून चक्क एक गाढव असल्याचं त्याच्या लक्षात आलं. त्यानंतर मोहम्मदने लगेचच त्या गाढवाचा फोटो काढून सोशल मीडियावर व्हायरल केला आणि हा प्रकार उघडकीला आला.
उपलब्ध माहितीनुसार, काही वर्षांपूर्वीही असाच एक गमतीशीर प्रकार उघडकीस आला होता. गाझामधील एका प्राणी संग्रहालयात पर्याटकांची दिशाभूल करणारी अशीच एक घटना घडली होती.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -