घरट्रेंडिंगIIT मद्रासने तयार केली पहिली स्टॅडिंग Wheelchair, पहा किंमत

IIT मद्रासने तयार केली पहिली स्टॅडिंग Wheelchair, पहा किंमत

Subscribe

कदा चार्जिंग केल्यानंतर व्हिलचेअर २५ किमी पर्यंत चालू शकते.

पायांनी अपंग असणाऱ्यांना स्वत:च्या पायांनी चालणे खूप कठीण गोष्ट आहे. स्वत:च्या पायांवर उभे राहणे हे त्यांच्यासाठी एका स्वप्नासारखे असते. पायांनी अपंग असलेल्या अनेक लोकांचे आयुष्य अनेक वेळा अंथरुण आणि व्हिलेचेअरवच जाते. अशा दिव्यांगाचे आयुष्य पुन्हा एकदा सुरळीत करण्यासाठी त्यांना नव्याने जीवनदान देण्यासाठी आयआयटी मद्रासने (IIT Madras) एक शानदार व्हिलचेअर (Wheelchair) तयार केली आहे. नियोबोल्ट असे व्हिलचेअरचे नाव आहे.  देशातील ही पहिली स्टॅडिंह व्हिलचेअर आहे ज्यात रुग्ण आपोआप सामान्य माणसासारका व्हिलचेअरच्या मदतीने ताठ उभा राहू शकतो.  (first standing wheelchair made by IIT Madras)

- Advertisement -

नियोबोल्ट व्हिलचेअर तयार करण्यासाठी विविध संगठना आणि रुग्णालयांचा सहभाग आहे. त्यांच्या मदतीने या व्हिलचेअर डिझाइन तयार करण्यात आले. ही व्हिलचेअर खडबड्या ठिकाणी देखील व्यवस्थित चालू शकते असे सांगण्यात आले आहे. IIT मद्रासने केलेल्या दाव्यानुसार, नियोबोल्ट व्हिलचेअरचा स्पीड २५ किमी प्रति तास इतका आहे. एकदा चार्जिंग केल्यानंतर व्हिलचेअर २५ किमी पर्यंत चालू शकते.

- Advertisement -

कंपनीने पर्सनलाइज व्हिलचेअर नियोफ्लाईची किंमत ३९,९०० रुपये ठेवण्यात आली आहे. तर मोटराईज ऐड ऑन व्हिलचेअर नियोहोल्टची किंमत ५५ हजार रुपये इतकी आहे. ही व्हिलचेअर खरेदी करण्यासाठी कंपनीच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकता. १ हजार रुपयांचे रजिस्ट्रेशन करुन ऑर्डरचे प्री बुकींग करता येऊ शकते.


हेही वाचा – चिंम्पांजीसोबत अफेअर, मग महिलाच झाली बॅन

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -