घरट्रेंडिंग'Work From Home' करताय? तर होणार पगार Cut!

‘Work From Home’ करताय? तर होणार पगार Cut!

Subscribe

जाणून घ्या कर्मचाऱ्यांच्या पगारात काय बदल होऊ शकतात

जगभरासह देशात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव सुरू असताना कोरोनाचा संसर्ग अधिक वाढू नये, म्हणून देशात कित्येक कंपन्यांनी त्याच्या कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम करण्यास परवानगी दिली होती. दरम्यान सर्वच ठप्प असताना कोणत्याही ठिकाणाहून वर्क फ्रॉम होम करणं शक्य असल्याने अनेक जण आपल्याला गावी किंवा शहरांमध्ये निघून गेले होते. मात्र आता त्यांना पगार कपातीच्या समस्येला सामोरे जावे लागू शकते. मिळालेल्या माहितीनुसार, सर्व्हिस सेक्टर कंपन्या अशा कर्मचाऱ्यांच्या पगारात कपात करणार आहेत, ज्या कर्मचाऱ्यांनी वर्क फ्रॉम होम करण्यासाठी मेट्रो शहरासह टियर १ शहरांना पसंती दिली आहे.

दरम्यान, कोरोना काळात प्रामुख्याने आयटी, आयटीईएस क्षेत्रातील कर्मचाऱ्यांचे वर्क फ्रॉम होम सुरू होते. मात्र आता कोरोना नियंत्रणात येत असतानाही बरेच कर्मचारी वर्क फ्रॉम होम करताय. विशेषतः आयटी, आयटीईएस, आर्थिक सेवा आणि व्यावसायिक सेवेतील कर्मचाऱ्यांना या प्रकारच्या परिस्थितीचा फटका बसणार असल्याचे सांगितले जात आहे. इकॉनॉमिक्स टाइम्सच्या वृतात मानव संसाधन तज्ज्ञ आणि कन्सल्टन्सी कंपन्यांना हवाला देत म्हटले आहे की, नव्या नियमांतर्गत घरून काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या वेतनात बदल होण्याची शक्यता आहे. आणि जर हे नवे नियम लागू करण्यात आले तर कंपन्या प्रत्येक छोट्या शहरातील वर्क फ्रॉम होम करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर २० ते २५ टक्के रक्कम वाचवू शकतील, असे सांगितले जात आहे.

- Advertisement -

तसेच, श्रम मंत्रालयाने सर्व्हिस क्षेत्रासाठी वर्क फ्रॉम होमला औपचारिक स्वरूप देण्याच्या प्रस्तावावर विचारही मागवले आहेत. दरम्यान या नव्या नियमांनुसार, जे कर्मचारी वर्क फ्रॉम होम करण्यालाच पसंती देत असतील, मात्र ते आता असतील त्या ठिकाणीच राहणार असतील, अशा कर्मचाऱ्यांना पगारात नाही तर त्यांच्या इतर मिळणाऱ्या भत्त्यांमदध्ये बदल झालेला दिसू शकतो. तज्ज्ञांच्या मते, कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांना वायफाय आणि इतर मूलभूत सुविधांसाठी नवे भत्ते देण्यास सुरूवात करू शकतात तर प्रवासी भत्त्यात कपात केली जाऊ शकते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -