घरट्रेंडिंगIndian Sleep Champion: ९ तास झोपा दहा लाख कमवा, कंपनीची भन्नाट ऑफर

Indian Sleep Champion: ९ तास झोपा दहा लाख कमवा, कंपनीची भन्नाट ऑफर

Subscribe

१० लाख मिळवण्यासाठी सलग १०० रात्री दररोज ९ तास गाढ झोप घ्यावी लागणार

प्रत्येकाला जगण्यासाठी पैसे लागतात. पैसे असल्यास माणसाला कोणती चिंता नसते. पैसे कमवायचे म्हणून अनेकांना झोप येत नाही. दिवस रात्र मेहनत घेऊन लोक पैसे कमावतात. पैसे कमावण्याच्या नादात काहींची झोप उडते मात्र भारतात एक अशी कंपनी आहे ती तुम्हाला झोपण्याचेच पैसे देते. फक्त झोपण्यासाठी कंपनी तुम्हाला तब्बल दहा लाख रुपये मिळवून देणार आहे. हे ऐकून सर्वांनाच धक्का बसला असेल पण हे खरं आहे. ही कंपनी आहे भारताच्या बंगळूरुमध्ये. स्लीप अँड हाऊस सॉल्युशन असे या कपंनीचे नाव आहे. या कंपनीत केवळ ९ तास गाढ झोपण्यासाठी तब्बल १० लाख रुपये दिले जातात. (Indian Sleep Champion: 9 hours of sleep, earn Rs 10 lakh)

या स्पर्धेत भाग घेण्यासाठी काही नियम आहेत. त्या नियमानुसार १० लाख मिळवण्यासाठी सलग १०० रात्री दररोज ९ तास गाढ झोप घ्यावी लागणार आहे. दररोज रात्री वेळेवर येऊन झोपणे हे काम स्पर्धकाला करायचे आहे. स्पर्धकांना व्यवस्थित गाढ झोप यावी यासाठी कंपनी योग्य सोय करणार आहे. वेकफिटची गादी आणि एक उत्तम स्लीप ट्रॅकर देण्यात येईल. त्याचप्रमाणे कंपनीकडून स्पर्धकाच्या झोपेचे निरिक्षण करण्यात येईल.

- Advertisement -

ही कंपनी दरवर्षी इंडियन स्लिप चॅम्पियन पुरस्काराची घोषणा करते. त्यासाठी कंपनी दरवर्षी एक स्लीप इंटर्नशिप कार्यक्रम राबवते. या इंटर्नशिपमध्ये जिंकणाऱ्याला कंपनीकडून १० लाख रुपये बक्षिस देऊन त्याला इंडियन स्लिप चॅम्पियन पुरस्काराने गौरवण्यात येते. त्याचप्रमाणे यात भाग घेणाऱ्याला १ लाख रुपये दिले जातात. लोकांनी चांगली झोप घ्यावी यासाठी या कार्यक्रमातून लोकांना प्रोत्साहित केले जाते. आजच्या काळ्यात लोकांची जिवनशैली बदलली आहे. कोरोनामुळे लोक स्ट्रेसमध्ये गेले आहेत. लोकांच्या झोपेच्या सवयी बदलल्या आहेत. अनेक जण नैराश्येचा सामना करत आहेत. लोकांना या सगळ्यातून बाहेर काढण्यासाठी आणि त्यांची झोपेची समस्या सोडवण्यासाठी कंपनी या कार्यक्रमाचे आयोजन करते.


हेही वाचा – रोज अंघोळ करण्याचे आहेत ‘हे’ साईड इफेक्टस

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -