घरट्रेंडिंगअंड्यातच कोंबडी होणार कोंबडा, इस्त्रायलमधे नवा स्टार्ट अप

अंड्यातच कोंबडी होणार कोंबडा, इस्त्रायलमधे नवा स्टार्ट अप

Subscribe

जे आपण अंड खातो त्यामागे एक किंमत दडलेली असते. दर वर्षी जगात जवळपास ७ बिलियन म्हणजेत ७०० कोटी कोंबड्यांची पिल्ले मारले जातात. कारण चिकन व्यवसायात यांची गरज कमी असते. जास्त गरज असते ती म्हणजे कोंबडीची. कारण कोंबडी अंडे देते. पण आता नर म्हणजेच कोंबड्याची हत्या रोखण्यासाठी इस्त्रायलने एक स्टार्ट अपचा नवीन मार्ग शोधला आहे. हा नवीन मार्ग अनोखा आहे. अंडे येण्यापूर्वीच कोंबडीचे रुपांतर कोंबड्यात होण्याचे ही नवी शक्कल इस्त्रायलमध्ये लढवली आहे. आता आपण याबद्दल जाणून घेणार आहोत.

जगभरातील कुक्कुटपालन करणाऱ्या शेतकऱ्यांना माहिती आहे की, जितकी अंडी कोंबडी देते, यामधील अर्धे कोंबडे असतात. त्यामुळे कोंबड्याचे पालन करणे आर्थिकदृष्टा नुकसानकारक असते. यामुळे बऱ्याच वेळा इंग्लंड सारख्या देशांमध्ये या कोंबड्यांना श्रेडिंग मशीनमध्ये टाकले जाते. काही ठिकाणी यांना मारले जाते.

- Advertisement -

द गार्जियन वेबसाईटने प्रकाशित केलेल्या वृत्तानुसार, जर हेच कोंबडे अंडे येण्यापूर्वी कोंबडी झाले तर त्यांना मारले जाणार नाही. यामुळे पोल्ट्री व्यवसायात वाढ होईल. कोंबडी बनणारे कोंबडे नंतरला अंडी पण देतील. या नवा मार्ग इस्त्रालयच्या स्टार्टअप कंपनी सूस टेक्नोलॉची अवलंबला आहे.

२०१७ साली सूस टेक्नोलॉजीची स्थापना झाली होती. त्यानंतर ३.३ मिलियन डॉलर म्हणजे २४.८ कोटी रुपयांची गुंतवणूक देखील झाली. आता कंपनीची इच्छा आहे की, ‘कॉमर्शिअल फॉर्म्समद्ये पोल्ट्री भ्रूण (Embryos)चे लिंग बदलले जाईल. जेणेकरून जेव्हा ते विकसित होईल तेव्हा अंड्यातून मादी पिल्ले बाहेर येईल. सूस टेक्नोलॉजीने साउंड वाइब्रेशनद्वारे काम करण्याचा निर्णय घेतला आहे.’ या कंपनीचे सीईओ याएल अल्टर म्हणाले की, ‘अंड्यांना साउंड वाइब्रेशनच्या जवळ ठेवले जाते, तेव्हा कोंबड्यांच्या पिल्ल्यांच्या जनुकांमध्ये बदल होतो. यामुळे त्यांचे कोंबड्याचा अंडकोष बदलून महिला अंडकोष, म्हणजेच अंडाशयात बदलले जाते.’

- Advertisement -

हेही वाचा – वाह ताज! आठवडाभर ‘ताज’मध्ये FREE मुक्काम; Valentine Day Offer वर ‘ताज’चा खुलासा


 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -