घरट्रेंडिंगजॉन सीनाने इंस्टाग्रामवर शिल्पा शेट्टीचा असा फोटो का पोस्ट केलाय?

जॉन सीनाने इंस्टाग्रामवर शिल्पा शेट्टीचा असा फोटो का पोस्ट केलाय?

Subscribe

WWE चा खेळाडू जॉन सीनाने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शिल्पा शेट्टीचा एक विचित्र फोटो अपलोड केला आहे. हा फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलाच चर्चेचा विषय ठरतोय. जॉन सिनाने अमेरिकेचा माजी पैलवान स्टीव ऑस्टीनच्या फोटोवर बॉलिवूडची अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा चेहरा लावला आहे. स्टीव ऑस्टीन हा ‘स्टोन कोल्ड’ या नावाने प्रसिद्ध आहे. जॉनने हा फोटो अपलोड केल्यानंतर त्याच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “स्टोन कोल्ड शिल्पा शेट्टी कुंद्रा”. शिल्पा शेट्टीने हा फोटो रिपोस्ट करत “हे खुप मजेदार आहे” अशी प्रतिक्रिया दिली आहे.

- Advertisement -

मात्र जॉन सिनाने असा फोटो मॉर्फ करून पोस्ट का केलाय हा प्रश्न उरतोच. खरंतर शिल्पा शेट्टी आणि जॉन याआधी सोशल मीडियावर एकमेकांशी बोलले होते. नुकतेच शिल्पाचा मुलगा वियान राज कुंद्राने Now India ला दिलेल्या मुलाखतीमध्येही जॉन सीना मला आवडत असल्याचा खुलासा केला होता. त्यानंतर जॉन सीनाने देखील वियानला मजेशीर उत्तर दिले. जॉन म्हणाला की, “वियान.. मी तुझा मित्र जॉन सीना बोलतोय. तुझा व्हिडिओ मी पाहिला. तुझे मसल्स पाहून मला पुन्हा जिममध्ये जाऊन वर्कआऊट करावं लागलं. तु जबरदस्त आहेस.”

- Advertisement -

जॉन सीनाने आपल्या मुलाला रिप्लाय दिल्यामुळे शिल्पा शेट्टीने जॉनचे आभार मानले होते. शिल्पा सध्या बॉलिवूड पासून दूर आहे. काही दिवसांपूर्वी ती टीव्हीवर ‘सुपर डांसर चॅप्टर ३’ या रिअॅलिटी शोमध्ये परिक्षक म्हणून दिसली होती. सध्या हा शो संपला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -