घरट्रेंडिंग'या' गावात फक्त महिला 'राज'; पुरुषांना 'नो एन्ट्री'

‘या’ गावात फक्त महिला ‘राज’; पुरुषांना ‘नो एन्ट्री’

Subscribe

तुम्ही कधी असं गाव किंवा अशी एखादी जागा पाहिली आहे का? त्या ठिकाणी फक्त महिलांचं राज्य आहे. किंवा अशी कोणती जागा किंवा गाव जिथे एकाही पुरूषाला प्रवेश दिला जात नाही. नाही नं…आज तुम्हाला अशा गावाची ओळख करून देणार आहोत. आफ्रिका देश केनियामध्ये असे डझनभर कुटुंबे राहतात पण त्या कुटुंबात एकही माणूस नाही. आता या गावातून स्त्रियांना जागेचा मालक मिळण्याचा मार्ग असल्याचे समोर आले आहे. केनियामध्ये दोन टक्क्यांहून देखील कमी जागेची मालकी महिलांच्या नावे आहे. हे गाव म्हणजे उमोजा. आजपासून साधारण ३१ वर्षांपूर्वी १५ महिलांनी मिळून हे गाव सुरू केले होते. ..वाचा सविस्तर या अनोख्या गावाविषयी…

तीस वर्षांपूर्वी उत्तर केनियात राहणाऱ्या जेन नॉल्मोंगनवर जेव्हा एका ब्रिटीश सैनिकाने बलात्कार केला, ही घटना समजताच तिच्या पतीने तिला घराबाहेर काढले. यानंतर, ती आपल्या मुलांसह सुरक्षित आश्रयाच्या शोधात, एका गावात पोहोचली. जे गावं म्हणजे या ठिकाणी संपूर्णपणे महिलांचा वावर आहे या गावात एकही पुरूष राहत न त्याला या गावात प्रवेश दिला जातो. जेन हिने शेतात काम केले आणि आपल्या आठ मुलांचे संगोपन केले. ते गेल्या तीन दशकांपासून सांबरु काउंटीमधील उमोजा गावात राहतात. आता ते शेत त्याच्या नावावर अधिकृतपणे नोंदणीकृत होणार आहे. डीडब्ल्यूच्या अहवालानुसार केनियामधील ९८ टक्के जमीन केवळ पुरुषांच्या नावावर आहे. बहुतेक आदिवासींमध्ये केवळ शेती व जमीनच नाही तर महिलांना वडील आणि नंतरच्या पतीची संपत्ती देखील दिली जाते.

- Advertisement -

पुरूष प्रधान पीडित महिलांना मानाचं स्थान

आता ५२ वर्षांची झालेली जेन म्हणते, हे गावं माझं आधार झालं आहे. आम्ही महिलांनी आमचं आयुष्य सुखकर करण्यासाठी सर्व महिलांनी एकत्रित येण्याचे ठरवले. १९९० मध्ये सांबरू महिलांच्या निवारा असलेल्या उमोजा हे गाव झालं. ज्या स्त्रिया लैंगिक छळातून बाहेर पडल्या आहेत, त्यांच्या घरातून, मालमत्तेतून किंवा मुलांकडून बेदखल झाल्यात, बाल विवाह किंवा अशा स्त्रिया त्यांचा ठावठिकाणा शोधतात हेच गाव त्यांचं आधार झालं. आता या काउंटीच्या प्रशासनाने या महिलांसाठी जमीन त्यांच्या नावाने नोंदणी करण्याची व्यवस्था केली आहे.

स्वाहिली भाषेत ‘उमोजा’ म्हणजे ऐक्य किंवा एकता. त्याची सुरूवात रेबेका लोलोसोली नावाच्या महिलेने केली होती, जेव्हा तिचा निषेध करणार्‍या पुरुषांच्या गटाने तिच्यावर हल्ला करून जखमी केले होते. तिच्या दुखापतीवर उपचार घेत असताना, तिने असे गाव तयार करण्याचा विचार केला जेथे पुरुषांना कधीच प्रवेश दिला जाणार नाही. तेव्हा १५ महिलांना सुरू केलेल्या या गावात एकेकाळी फक्त ५० हून अधिक परिवार राहत होते. याठिकाणी घरांपासून शाळांपर्यत सगळं नव्याने निर्माण करण्याचं काम येथील महिला वर्गाने केलं. येथील महिला मधाच्या व्यापारासह आपल्या हातांनी बनवलेल्या वस्तू विकून आपलं पोटं भरण्याचं काम करतात.

Harshada Shinkarhttps://www.mymahanagar.com/author/sharshada/
गेल्या ५ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव. लाईफ स्टाईल, फॅशन, महिलांसंबधित विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -