घरट्रेंडिंगपालीचे अन् मालकाच्या कपड्याचेही मॅचिंग, इंटरनेटवर कंपनीचा धुमाकुळ

पालीचे अन् मालकाच्या कपड्याचेही मॅचिंग, इंटरनेटवर कंपनीचा धुमाकुळ

Subscribe

एरव्ही थंडीच्या दिवसांमध्ये अनेक लोक आपल्या पाळीव प्राण्यांना (Clothes for pet Animasl) ला कपडे घालतात. जेणेकरून अशा थंडीच्या काळात या प्राण्यांचे थंडीपासून संरक्षण व्हावे आणि त्यांना उब मिळावी हा त्यामागचा उद्देश असतो. बहुतेक लोकांकडून पाळीव प्राण्यांच्या कपड्यांवरही चांगलेच पैसे खर्च करण्यात येतात. पण आता फक्त पाळीव प्राण्यांसाठीच कपडे तयार करणे मर्यादित राहिलेले नाही, तर एक कंपनी पालींसाठीही कपडे (Cloths for lizards) तयार करू लागली आहे हे विशेष. पालींच्या कपड्यांशी मिळतेजुळते असे त्या पालीच्या मालकांचेही कपडे ही कंपनी डिझाईन करते.

एका फॅशन ब्रॅंडमधील कंपनीने या पालींच्या कपड्यांचे डिझाईन केले आहे. जगभरात ही कंपनी अतिशय प्रसिद्ध झाली आहे ती पालींसाठी कपडे तयार करण्याच्या ब्रॅण्डमुळे. ही कंपनी पालीच्या आकारानुसार त्या पालीला फिट बसतील असेच कपडे तयार करते. त्यासोबतच पालीच्या रंगाचेच कपडे हे पालीच्या मालकासाठीही ही कंपनी तयार करते. या कंपनीची सुरूवात ही पेनेलॉप गजीन (penelope Gazin) नावाच्या महिलेने या कंपनीची सुरूवात केली आहे. या महिलेच्या वेबसाईटवही पालीच्या वेगवेगळ्या आकाराचे कपडे डिझाईन केलेले दिसतात. या कंपनीच्या कपड्यांची डिझाईन अतिशय वेगळी असते.

- Advertisement -

पालींसाठी तयार करण्यात येणारे काही कपडे हे मानवी केसांपासूनही तयार करण्यात येतात. प्रत्येक डिझाईन ही आगळीवेगळी असते आणि प्रत्येकाला हैराण करणारी अशी आहे. अनेक कपडे हे जुन्या जमान्यातील वाटतात तर काही कपड्यांची डिझाईन ही मोकळे ढाकळेही असतात. या डिझाईनला वेबसाईटवर खूपच पसंती मिळते.

- Advertisement -

सोशल मिडियावर तुफान प्रसिद्धी

या कंपनीचे सोशल मिडियावर इंस्टाग्राम वेबसाईटवरही अकाऊंट आहे. या इंस्टाग्राम अकाऊंटच्या माध्यमातून पालींना कपडे (Lizard clothing Instagram) घातल्याचे सातत्याने दिसून येते. कंपनी मॅचिंग कपडेही तयार करते, याबाबतचे फोटोही सोशल मिडियावर दिसून येतात. त्यामुळेच जे लोक पाली पाळण्यासाठीचे शौकीन आहेत, अशा लोकांसाठी ही वेबसाईट ही उत्तम कपडे शॉपिंग करण्यासाठी पर्याय देणारी कंपनी आहे. अनेक लोक सोशल मिडियावर हे कपडे पाहून हैराण होतात. पालीसाठी आकर्षक कपड्यांची मागणी डिझाईन पाहूनच अनेक लोक हे आपल्या कुत्रा, मांजरींसाठीही कपड्यांची मागणी करत आहेत.

एका व्हिडिओत एक पाल छोटीशी हॅट घालून बसलेली दिसताना आहे. तर पालीलाल छान अशी क्यूट ड्रेसही आहे. त्यामुळे या फोटोंना आणि व्हिडिओला मोठी पसंती मिळते. अनेकांनी हे फोटो पाहून वेबसाईटला ऑर्डरही केल्या आहेत. तर अनेकांना स्टाईल कॉम्बिनेशनही पसंत आले आहे. काही जणांनी पालींसाठी अशी कपड्यांची डिझाईन केल्यासाठी नाराजीही व्यक्त केली आहे.


 

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -