घरट्रेंडिंगझरीन खानच्या गाडीचा अपघात, एकाचा मृत्यू

झरीन खानच्या गाडीचा अपघात, एकाचा मृत्यू

Subscribe

झरीन खानच्या गाडीने धडक दिल्याने झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी झरीच्या चालकाविरोधात हयगतीचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

आपल्या अभिनयाने अनेकांना घायाळ करणारी अभिनेत्री झरीन खानच्या गाडीने एकाला धडक दिली आहे. या घटनेनंतर उपचारादरम्यान तरुणाचा मृत्यू झाला आहे. उत्तर गोव्यातील अंजुना बीच परिसरात हा प्रकार घडला आहे. याप्रकरणी गोवा पोलिसांनी वाहनचालकावर हयगतीचा गुन्हा नोंदवला आहे. अंजूनबीचवर उशीरा रात्री हा अपघात घडला. झरीनच्या गाडीने एका दुचाकी स्वाराला धडक दिली. नीतेश गोरल (३१) असे या तरुणाचे नाव आहे.  नीतेशच्या स्कुटरला झरीनची गाडी धडकल्यामुळे अपघात होता. या अपघातात त्याच्या डोक्याला दुखापत झाली होती. असिलो रुग्णालयात त्यावर उपचार सुरु होते. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. अपघातादरम्यान झरीन गाडीत उपस्थित असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

“नितेश ने मरणापूर्वी दिलेल्या माहितीनुसार आम्ही तपास करत आहोत. झरीन खान ही इनोव्हा गाडीत होती. गाडीचा चालक अपघाताच्या वेळी यू टर्न घेत होता. त्यावेळी मागून येत असलेली दूचाकी या गाडीला धडकली. अपघातात इनोव्हा गाडीच्या आरशाचे नुकसान झाले आहे. परिसरात असलेल्या सीसीटीवीच्या आधारावर पोलीस तपास करत आहेत. झरीन खानचा चालक अली अब्बासला ताब्यात घेण्यात आले होते. ” – तपास अधिकारी, अंजूना बीच पोलीस

- Advertisement -

काही दिवसांपूर्वी खार पोलिसांकडे केली होती तक्रार

बॉलिवूड अभिनेता सलमान खान याच्यासोबत आपल्या करिअरची सुरुवात करणारी अभिनेत्री जरीन खान हीने खार पोलीस ठाण्यात नुकतीच तक्रार नोंदवली होती. आपली माजी व्यवस्थापक अंजली अथ हिच्या विरोधात हा गुन्हा नोंदवण्यात आला होता. पैशावरील वादामुळे तिने जरीन खानला हे अपशब्द वापरले असल्याचे सांगितले होते.  ५०९ कलमाअंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला होता. झरीन खान ने आपल्या करिअरची सुरुवात वीर या चित्रपटातून केली होती. यानंतर हेटस्टोरी, अक्सर २, वजह तुम हो, हाऊसफुल २ आणि १९२१ अशा अनेक चित्रपटांमध्ये तिने काम केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -