घरट्रेंडिंगViral Video: लस घेताना लहान पोरागत रडला व्यक्ती, व्हिडीओ झाला व्हायरल

Viral Video: लस घेताना लहान पोरागत रडला व्यक्ती, व्हिडीओ झाला व्हायरल

Subscribe

देशातील नागरिकांचे लसीकरण करण्यासाठी आरोग्य यंत्रणेने कंबर कसली आहे. अनेक लहान गावात खेड्यांमध्ये लोकांना लसीकरणाबाबत जनजागृती करण्यासाठी आणि घरोघरी जाऊन लस देण्यासाठी आरोग्य सेवकांची नेमणूक करण्यात आली आहे. सोशल मीडियावर यासंबंधीचे अनेक व्हिडीओ देखील व्हायरल होत असतात. असाच एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे ज्यात गावातील एका व्यक्तीला लस देण्यासाठी आरोग्यसेविका आणि गावातील इतर मंडळी प्रयत्न करत आहेत. मात्र ती व्यक्ती काही लस घेण्यास तयार नाही. लहान मुलांप्रमाणे रस्त्यात लोळून ढसाढसा रडताना दिसत आहे. त्या व्यक्तीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला असून नेटकऱ्यांच्या त्यावर अनेक हास्यास्पद कमेंट येत आहेत.

व्हायरल व्हिडीओध्ये व्यक्तीला लस घेण्यासाठी आरोग्य सेविका विनवण्या करत आहे. मात्र तो व्यक्ती काही लस घेण्यासाठी तयार नाही. शेवटी त्या व्यक्तीला चार माणसे धरुन ठेवतात आणि लस देतात. लस घेतना ती व्यक्ती मोठ्या मोठ्या ओरडत आहे. लहान मुलांप्रमाणे रडताना पाहून त्याच्या आजूबाजूचे लोकही हसताना दिसत आहेत. मी लस घेणार नाही असे मोठ्या मोठ्याने ओरडताना पाहून आजूबाजूचे लोक पोट धरुन हसत आहेत.

- Advertisement -

हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांना त्यांचे बालपणीचे दिवस आठवले आहेत. अनेकांनी मी देखील लहान असताना असाच रडायचो असे म्हटले आहे. या व्हिडीओ सोशल मीडियावर आतापर्यंत लाखो व्ह्यूज मिळाले आहेत. तर हजारो कमेंट्स आणि शेअर्स मिळाले आहेत.

- Advertisement -

या आधी देखील खेडेगावातील लोकांना लस देण्यासाठी गेलेल्या आरोग्यसेविकांचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यात आरोग्य सेविका गावातील महिलांच्या स्टाइलमध्ये ‘लस घे माय, लस घे ताई’ असे म्हणून लस देण्यासाठी दारोदारी फिरत होत्या. नेटकऱ्यांनी या व्हिडीओला देखील तूफान प्रतिसाद दिला होता.

 


हेही वाचा – ट्रान्सजेंडर पुरुषाने दिला मुलाला जन्म

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -