घरट्रेंडिंग#metoo- संजना सांघीने घेतला 'यू टर्न'

#metoo- संजना सांघीने घेतला ‘यू टर्न’

Subscribe

#metoo मोहीमेअंतर्गत सुशांत सिंग राजपूतवर अभिनेत्री संजना सांघीला त्रास देण्याचे आरोप करण्यात आले होते. मात्र हे आरोप चुकीचे असल्याचे ट्विट संजनाने केलं आहे. सुशांत सिंग राजपूत माझ्याशी कधीच चुकीचा वागला नाही. अभिनेत्री संजना सांघीने केला खुलासा.

#metoo मोहीमेअंतर्गत बॉलिवूड अभिनेत्री आपल्यावर झालेल्या अत्याचाराबाबत आरोप करत आहेत. #metoo मोहीमेत आतापर्यंत अनेक कलाकारांचे नाव समोर आले आहे. या आरोपादरम्यान अभिनेता सुशांत सिंग राजपूतचेही नाव समोर आले होते. अभिनेत्री संजना सांघीने सुशांतवर गंभीर आरोप केल्याच्या बातम्या सोशल मीडियावर टाकण्यात आल्या होत्या. यामध्ये सुशांत आणि संजना यांच्यातील संभाषणाचे स्क्रीन शॉर्ट्स टाकण्यात आले होते. मात्र या सर्व बातम्या खोट्या असल्याचे संजनाने सांगितले आहे. याच बरोबर अमेरिकेत सुट्टीसाठी गेली असल्यामुळे तिला या बातम्यांची माहिती नसल्याचे म्हटलं आहे. अभिनेत्री संजना सांघी पहिल्यांदा २०११ मध्ये रॉकस्टार या चित्रपटात झळकली होती.

- Advertisement -

काय आहे प्रकरण

संजना आणि सुशांत यामधील काही खाजगी मॅसेजचे स्क्रिनशॉर्ट्स सोशल मीडियावर वायरल झाले होते. सुंशात शुटिंगदरम्यान संजनाला त्रास देतो. याची तक्रार संजनाने दिग्दर्शक मुकेश छाबडायांना केली होती. तेव्हा मुकेशयांनी यावर कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. अखेर संजनाचे आई-वडिल चित्रपटाच्या सेटवर आले. त्यांनी या बाबत दिग्दर्शकाला तक्रार केली. मात्र चित्रपटाच्या सेटवर अशा घटना होणे सहाजीकच असल्याचे सांगण्यात आले अशा बातम्या सोशल मीडियावर झळकल्या.

सुशांतने दिले ट्विटरवरुन स्पष्टीकरण

सोशल मीडियावर बातम्या पसरल्यामुळे अभिनेता सुशांत सिंग राजपूत याने ट्विटरवरुन स्पष्टीकरण दिले. त्याच्यावर लागलेल्या आरोपांना फेटाळत त्याने लिहिले की, “माझी खाजगी माहिती सोशल मीडियावर शेअर करताना मला वाईट वाटत आहे. मात्र चित्रपटाच्या शुटिंगच्या सुरूवातीच्या दिवसापासून आमच्यामध्ये इतकेच संभाषण झाले.”

- Advertisement -

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -