Sarva Pitru Amavasya 2021: सर्वपित्री अमावस्येला ११ वर्षांनी आलाय खास योग, वाचा महत्त्व

पितृ पक्षात ज्यांचे श्राद्ध घालता आले नाही किंवा ज्यांची तिथी माहिती नाही अशा लोकांची श्राद्ध आजच्या दिवशी घातली जातात

Sarva Pitru Amavasya 2021 special yoga After 11 years
Sarva Pitru Amavasya 2021: सर्वपित्री अमावस्येला ११ वर्षांनी आलाय खास योग, वाचा महत्त्व

आज सर्वपित्री अमावस्या (Sarva Pitru Amavasya 2021) किंवा श्राद्ध पक्षाचा शेवटचा दिवस असे म्हणता येईल. सर्व पितृ अमावस्येला विसर्जनी अमावस्या असे देखील म्हटले जाते. आजच्या दिवशी सर्वपित्रांचे श्राद्ध घातले जाते. पितृ पक्षात ज्यांचे श्राद्ध घालता आले नाही किंवा ज्यांची तिथी माहिती नाही अशा लोकांची श्राद्ध आजच्या दिवशी घातली जातात. अश्विन महिन्यात येणारी ही सर्वपित्री अमावस्या यंदा विशेष योग घेऊन आली आहे. काय आहे शुभ मुहूर्त आणि विशेष योग जाणून घ्या.

यंदा सर्वपित्री अमावस्येला गजछाया योग आहे. ११ वर्षांआधी २०२१ साली असा योग आला होता. गजछाया योग हा अत्यंत शुभ मानला जातो. ६ ऑक्टोबरला सूर्योद्यापासून सूर्य आणि चंद्र संध्याकाळी ४ वाजून ३४ मिनिटांपर्यंत हस्त नक्षत्रात असेल. या स्थितीमुळे गजछाया योग जुळून आला आहे. धार्मिक मान्यतेनुसार, गजछाया योग श्राद्ध केल्याने पित्र प्रसन्न होतात असे म्हटले जाते. असे म्हणतात की, हा गजछाया मुहूर्तावर श्राद्ध केले तर पित्र पुढील १२ वर्षांसाठी शांत होतात. पुढील गजछाया योग हा ८ वर्षांनी २०२९मध्ये येणार असल्याचे सांगितले जात आहे.

सर्वपित्री अमावस्येला यंदा गजछाया योग आला आहे. त्यामुळे गजछाया मुहूर्तावर पित्रांचे श्राद्ध करा आणि त्यांनी घी किंवा तुप घातलेले पदार्थ नैवेद्य दाखवा किंवा इतरांना खाऊ घाला. या दिवशी गरीब, भुकेलेल्यांना दान करावे. या दिवशी अन्न आणि वस्त्र दान केल्याने सर्व संकटे दूर होताता असे म्हटले जाते.


हेही वाचा – Viral Photo: पुराच्या पाण्यात भांड्यात ठेऊन नवजात चिमुकल्याला दिला पोलिओचा डोस