घरट्रेंडिंगमुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंवर आक्षेपार्ह पोस्ट टाकणारी महिला भाजपशी संबंधित?

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंवर आक्षेपार्ह पोस्ट टाकणारी महिला भाजपशी संबंधित?

Subscribe

ट्विटरवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांचा आक्षेपार्ह फोटो पोस्ट केल्याप्रकरणी मुंबई सायबर पोलिसांनी सुनयना होले या महिलेविरोधात गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल होताच या महिलेला अटक करण्यात आली होती, मात्र त्यानंतर त्यांची जामिनावर सुटका करण्यात आली आहे. मात्र ही सुटका करत असताना भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी या महिलेला मदत केल्याचे समोर आले आहे. त्यावरुन या महिलेचा भाजपशी संबंध असल्याचे बोलले जात आहे.

सुनयना होले या अकाऊंटवरुन २५ जुलै रोजी मुख्यमंत्री ठाकरे आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांचे फोटो एडिट करुन आक्षेपार्ह मजकूर लिहिण्यात आला होता. उद्धव ठाकरे यांना मौलवीच्या वेशात तर आदित्य ठाकरे यांना साप दूध पितानाचा फोटो एडिट करण्यात आला होता. त्यानंतरही सतत या अकाऊंटवरुन ठाकरे यांच्यावर खालच्या दर्जाची टीका करण्यात येत होती. अखेर वकील धर्मेंद्र मिश्रा यांनी दिलेल्या तक्रारीनंतर हा गुन्हा नोंदवण्यात आला.

- Advertisement -

मात्र गुन्हा नोंद झाल्यानंतर दिल्लीतील भाजप प्रवक्ते ताजिंदर पाल बग्गा यांनी मुंबईतील भाजप युवा मोर्चाचे देवांग दवे यांना या प्रकरणात लक्ष घालून संबंधित महिलेच्या जामिनासाठी प्रयत्न करण्यास सांगितले होते. यानंतर दवे यांनी ट्विटरवर बग्गा यांना रिप्लाय देवून संबंधित महिलेला जामिन मिळाला असून पारदर्शक पद्धतीने चौकशी सुरु असल्याचे उत्तर दिले.

- Advertisement -

सुनयना होले या महिलेवर गुन्हा दाखल होणार हे कळताच भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी देखील ५ ऑगस्ट रोजी ट्विटरवरुन सुनयना यांना मदत देणार असल्याचे सुतोवाच केले होते. महाष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचा अशाप्रकारे अपमान केल्यामुळे हा संपुर्ण राज्याचा अवमान होत असल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यामुळे सायबर पोलिसांनी याची तातडीने दखल घेत. IPC कलम १५३ (अ), ५०५ (२), ५००, ५०१, ५०४ अन्वये गुन्हा दाखल केला होता.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -