घरट्रेंडिंगअरेरे, 'मिस आफ्रिका' बनताच जळाले तिचे केस!

अरेरे, ‘मिस आफ्रिका’ बनताच जळाले तिचे केस!

Subscribe

‘मिस इंडिया’ असो किंवा मग ‘मिस आफ्रिका’ इतक्या मोठ्या पुरस्कराने सन्मानित होणं कुठल्याही मॉडेलसाठी अभिमानाची गोष्ट असते. इतका मोठा खिताब जिंकणाऱ्या महिलेसाठी तो क्षण खूप आनंददायी असतो. मात्र, नेमकं त्याचवेळी एखादी अघटीत घटना घडली तर त्याहून दु:खाची बाब नाही. नुकत्याच पार पडलेल्या ‘मिस आफ्रिका २०१८’ च्या पुरस्कार प्रदान सोहळ्यात काहीशी अशीच घटना घडली. डोरकास कासिंदे या मॉडेलच्या डोक्यावर ‘मिस आफ्रिका २०१८’ चा मुकूट घालण्यात आला. डोरकाससह सर्वजण त्यावेळी खूप खूष होते. मात्र, काही वेळातच त्यांच्या आनंदावर विरझण पडलं. डोरकासने विनींग क्राऊन परिधान केल्यानंतर ती कुणालातरी मिठी मारत होती पण त्याचवेळी अचानक तिच्या केसांनी पेट घेतला. स्टेजवर सेलिब्रेशन सुरु असताना पाठीमागे कृत्रिम फटाक्यांची आतषबाजी सुरु होती. सूत्रांनुसार, त्यातील एक ठिणगी डोरकासच्या ‘विग’वर (खोटे केस) पडली आणि तिच्या केसांनी मागच्या बाजूने पेट घेतला.  मिठी मारुन आपला आनंद व्यक्त करत असलेल्या डोरकासला सुरुवातीला ही गोष्ट लक्षात आली नाही. मात्र, काही क्षणात स्टेजवर एकच गदारोळ झाला.

मात्र, काही वेळातच परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यात क्रू मेंबर्सना यश आले. सुदैवाने या घटनेत डोरकासला किंवा अन्य कोणत्याही व्यक्तीला इजा झाली नाही. आग लागताच डोरकासचा विग तातडीने काढून आग विझवण्यात आली. आगीचे प्रमाणही कमी असल्यामुळे त्यावर नियंत्रण मिळवणे सहज शक्य झाले. दरम्यान, या घटनेचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियाव तूफान व्हायरल होत आहे.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -