घरट्रेंडिंगVideo: पुरुषांनी घरी बसा त्यामुळे महिला सुरक्षित राहतील!

Video: पुरुषांनी घरी बसा त्यामुळे महिला सुरक्षित राहतील!

Subscribe

या महिलेच्या व्हिडिओवरून सध्या ट्विटरवर नेटकऱ्यांमध्ये वादविवाद सुरू आहे.

हैदराबाद मधील बलात्कार प्रकरणानंतर देशभरातील अनेक ठिकाणी आंदोलने केली जात आहेत. पुन्हा एका महिला सुरक्षितेबद्दल प्रश्न ऐरणीवर आला आहे. सध्या सोशल मीडियावर एका महिलेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओ मध्ये ती स्त्रीयांना घरी राहण्याचा सल्ला देत आहे कारण हा समाज सुरक्षित नाही आहे.

ट्विटरवरील नताशा नावाच्या युझरने हा व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला आहे. तिने हा व्हिडिओ शेअर करताना लिहिलं की, ‘हा भारतीय महिलेचा आवाज आहे. मला असं वाटतं नाही की, पुरुषांनी माझं रक्षण करावं. मला असं म्हणायचं आहे की, तुम्ही समस्येचे कारण आहात. तुम्ही घरी राहा. जगाला मोकळे होऊ द्या. किती काळ आपण तिच्याकडे दुर्लक्ष करू?

- Advertisement -

या व्हिडिओमध्ये त्या महिलेने ‘महिलेवर बलात्कार केला’ आणि ‘त्याने महिलेवर बलात्कार केला’ असं लिहिलं पोस्टर घेऊन उभी राहिलेली दिसतं आहे. ‘महिलेवर बलात्कार केला’ या वाक्याअगोदर एका बॉक्समध्ये चुकीचं चिन्ह आहे, तर ‘त्याने महिलेवर बलात्कार केला’ या वाक्याअगोदर बरोबरचं चिन्ह एका बॉक्समध्ये केलेलं दिसतं आहे. तसंच या दोन्ही वाक्या खालील #ChangeTheNarrative असं देखील लिहिलं आहे.

- Advertisement -

तिच्या या पोस्टमधून असं सूचित केलं आहे की, ‘महिलेवर बलात्कार झाला’ हे चुकीचं असून ‘त्याने त्या महिलेवर बलात्कार केला’ हे बरोबर आहे.

या व्हिडिओमध्ये ही महिला असं म्हणाली आहे की, ‘एखाद्या स्त्रीने संध्याकाळी ७ वाजल्या नंतर घरी राहिलं पाहिजे, मग असं पुरुषांनी का नाही? आता सर्व पुरुषांना संध्याकाळी ७ वाजता घरी येऊ द्या आणि त्यानंतर दरवाजा लॉक करा. मग आम्ही सर्व महिला सुरक्षित राहू. मला असं म्हणायचं नाही आहे की, पोलिसांनी माझं रक्षण करावं किंवा भावाने माझं रक्षण करावं किंवा एखाद्या पुरुषांने माझं रक्षण करावं. मला असं म्हणायचं आहे की, या समस्येचं कारणं आपण आहात. तुम्ही घरी राहा आणि हे जग मुक्त करा.’

सध्या या व्हिडिओवरून ट्विटरवर वादविवाद सुरू आहे. बऱ्याचं नेटकऱ्यांनी तिचं कौतुक केलं आहे. तसंच ही महिला प्रत्येक भारतीय स्त्री काय म्हणण्याचा प्रयत्न करीत आहे हे सांगत आहे.


हेही वाचा – जत्रेतील पाळण्यात बसत असाल तर ‘हा’ व्हिडिओ जरुर पाहा


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -