घरUncategorizedअंधेरी पूल दुर्घटना; मोटरमनच्या प्रसंगावधनामुळे टळला मोठा अपघात

अंधेरी पूल दुर्घटना; मोटरमनच्या प्रसंगावधनामुळे टळला मोठा अपघात

Subscribe

अंधेरीतील पुल दुर्घटनेमध्ये मोटरमनने दाखवलेल्या सर्कतेमुळे मोठा अपघात टळला आहे. मोटरमन चंद्रशेखर सावंत यांनी इमर्जन्सी ब्रेक लावल्याने संभाव्य अपघात टळला आहे.

अंधेरी पूल दुर्घटनेमध्ये मोटरमन चंद्रशेखर सावंत यांनी दाखवलेल्या प्रसंगावधनामुळे मोठा अपघात टळला आहे. पूल कोसळला त्यावेळी बोरिवलीवरून चर्चगेटकडे जाणाऱ्या लोकलमध्ये चंद्रशेखर सावंत हे मोटरमन म्हणून कार्यरत होते. त्यावेळी पुलाचा काही भाग कोसळल्याचे चंद्रशेखर सावंत यांच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी इमर्जनी ब्रेक लावत गाडी थांबवल्याने पुढील अनर्थ टळला. सकाळी ७.३० वाजता अंधेरीतील गोखले ब्रिजचा काही भाग कोसळला. यामध्ये ५ जण जखमी झाले असून सध्या त्यांच्यावर कुपर रूग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यामुळे रेल्वेसेवेवर देखील परिणाम झाला असून प्रवाशांचे प्रचंड हाल झाले आहे. रेल्वे ट्रॅकवर पुलाचा काही भाग कोसळल्याने मोठी दुर्घटना होण्याची शक्यता होती. पण, मोटरमनने दाखवलेल्या सतर्कतेमुळे मोठा अपघात टळला आहे. सोमवारी रात्रीपासून पावसाचा जोर असून मुंबईतील रेल्वेसेवेवर त्याचा परिणाम झाला आहे. त्यामुळे मध्य आणि हार्बर रेल्वेची वाहतूक उशिराने धावत आहे.

- Advertisement -

पूल दुर्घटनेमुळे प्रवाशांचे प्रचंड हाल

अंधेरीतील गोखले पूल दुर्घटनेमुळे पश्चिम रेल्वेवरील प्रवाशाचं प्रचंड हाल झाले आहे. पुलाचा भाग कोसळल्याने सध्या अंधेरी स्थानकात एकही रेल्वे येत नाही आहे. त्यामुळे प्रवाशांचे प्रंचड हाल झाले आहे. सकाळी ७.३० वाजता पुलाचा काही भाग कोसळून ५ जण जखमी झाले आहे. जखमींवर सध्या कपूर रूग्णालयात उपचार सुरू आहे. रेल्वे ट्रॅकवर पुलाचा भाग कोसळल्याने नशीब बलवत्तर अशीच प्रतिक्रिया स्थानिकांसह मुंबईकर देत आहेत. कारण, पुलाचा काही भाग जर रेल्वेवर कोसळला असता तर मोठा अनर्थ घडला असता. यावेळी मोटरमन चंद्रशेखर सावंत यांनी प्रसंगावधान दाखवत रेल्वे थांबवल्याने मोठा अनर्थ ठरला आहे.

अपघातांचा दिवस

मुंबईतील मंगळवारचा दिवस उजाडला तोच मुळात दुर्घटननेची बातमी घेऊन. कारण, गोखले पूल दुर्घटनेनंतर वांद्र्याहून कलिनाकडे जाणाऱ्या डबल डेकर बसला देखील अपघात झाला. यावेळी बस ओव्हरहेड रेलिंगला धडकल्याने बसचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. दरम्यान, गोखले पूल दुर्घटनेनंतर बसने ४४ जादा बसेस सोडल्या आहेत. मुंबईची लाईफलाईन ठप्प झाल्याने रस्ते वाहतुकीवर सध्या मोठा ताण दिसून येत आहे. मिळेल त्या वाहनाने घरी, ऑफिसला जाण्यासाठी मुंबईकरांची झुंबड उडत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -