घरUncategorizedनाशिक-मुंबई महामार्गावर गॅस टँकर उलटल्याने गॅस गळती

नाशिक-मुंबई महामार्गावर गॅस टँकर उलटल्याने गॅस गळती

Subscribe

टँकरमध्ये अठरा टन गॅस असल्याने नगरिकांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले.

नाशिक-मुंबई महामार्गावर गॅस टँकर उलटल्याने गॅस गळती सुरु झाली होती. प्रसंगावधान राखत वाहतूक वळविण्यात आली असून गॅस गळती रोखण्यासाठी प्रयत्न सुरु होते. आता ही गॅस गळती थांबली आहे. दरम्यान, मुंबई-आग्रा महामार्गावरील वाहतूक दोन तासापासून ठप्प झाली होती. वाडीव-हे, जातेगाव, आठवा मैल परिसरातून काही वाहतूक वळविण्यात आली आहे. घटनास्थळी अग्निशामक दलाला पचारण करण्यात आले आहे.

नेमकं काय घडले?

नाशिक मुंबई महामार्गावरील रायगड नगर जवळील वालदेवी पुलावर सकाळी एक ट्रक पलटी झाला. त्यांनतर त्याच्या जवळच एक गॅस टँकर पलटी झाल्याने आणि त्यातून मोठ्याप्रमाणावर गॅस गळती सुरु झाल्याने घबराट निर्माण झाली होती. पोलिसांनी तत्काळ दोन्ही बाजुची वाहतूक तिन-चार किलोमीटर दूरवर थांबवली. यामुळे काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. त्यानंतर वाडीव-हे, जातेगाव, आठवा मैल अशी वाहतूक वळवून कोंडी फोडण्यात आली.

- Advertisement -

अपघातात तीन जणांचा मृत्यू

सकाळी ७ वाजता याच ठिकाणी ट्रक क्र. एम.पी.०९.१६२१ हा ट्रक पलटी होऊन झालेल्या अपघातात लक्ष्मन सोलंके (२३), दिनेश सिसोदिया (२४) आणि कैलास सरोदिया (२६) असे ट्रक चालक आणि क्लीनर यांच्यासह तीन जण जखमी झाले. त्यांना नरेंद्र महाराज संस्थानच्या रुग्नवाहिकेने जिल्हा रुग्णालयात हलविले. गॅस टँकर आणि ट्रक यांचा अपघात दोन ते तीन तासांच्या फरकाने एकाच ठिकाणी झाला. टँकरमध्ये अठरा टन गॅस असल्याने नगरिकांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले होते. सांयकाळपर्यंत वाहतुकीवर याचा परिणाम झाला. गॅस टँकरमधील चालक किरकोळ जखमी असल्याचे समजले. अपघात ठिकाणी नाशिक वाडीव-हे या भागाचे पोलिस निरीक्षक सुहास देशमुख आपल्या ताफ्यासह हजर होते. नरेंद्र महाराज संस्थानची रुग्नवाहिका आणि अग्निशमन दलाचा बंब घटनास्थळी हजर होते.


हेही वाचा – मुंबई-आग्रा महामार्गावर गॅस टँकर पलटी; ६ तासापासून वाहतूक ठप्प

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -