तीन लाख मुंबईकरांची दुसऱ्या डोसकडे पाठ

मुंबईत कोरोना रुग्णसंख्या कमी झाल्याने कोरोना निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. यामुळे आता पुन्हा एकदा मुंबईकर रेल्वे, बाजार, थिएटर, मंदिरात गर्दी करू लागले आहेत.
पण विशेष म्हणजे तीन लाख मुंबईकरांनी अद्याप लसीचा दुसरा डोस घेतलेलाच नाहीये. पण असे असतानाही मुंबईकर मात्र बिनधास्त झाल्याचे पाहायला मिळत आहे. पण हीच बेफीकीरी मुंबईकरांना महाग पडण्याची शक्यता आहे. कारण कोरोनाचा सामना करण्यासाठी एक नाही तर दोन लसी घेणं गरजेचे आहे. तर मुंबईकर पूर्ण क्षमतेने कोरोनाचा सामना करु शकणार आहेत. पण एक लस पुरेशी असा अनेकांचा गैरसमज झाला आहे. यामुळे कोरोनाची तिसरी लाट टाळायची असेल तर दुसरा डोस घेणे मुंबईकरांना आवश्यक आहे.