घरमहाराष्ट्रउद्धव ठाकरेंना फाईलीवर सह्या करताना सतर्क रहावे लागेल - चंद्रकांत पाटील

उद्धव ठाकरेंना फाईलीवर सह्या करताना सतर्क रहावे लागेल – चंद्रकांत पाटील

Subscribe

देवेंद्र फडणवीस यांची विधानसभेचे विरोधी पक्षनेतेपदी निवड झाल्यानंतर सभागृहात त्यांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव ठेवला गेला. यावर बोलताना भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले की, ‘उद्धव ठाकरेंच्या भावनांचा आम्ही आदर करतो. आम्ही तुम्हाला विरोध करणार नाही. पण तुमच्यासोबत जे आहेत त्यांना आम्ही विरोध नक्की करु’, असे सांगताना चंद्रकांत पाटील यांनी उद्धव ठाकरेंना एक धोक्याची सूचना दिली आहे. ‘तुमच्यासोबत जे सत्तेत आहेत, ते १५ वर्ष तुमच्या विरोधात होते. त्यामुळे फाईलीवर सह्या करताना जरा सांभाळून राहा, असा सल्ला चंद्रकांत पाटील यांनी उद्धव ठाकरे यांना दिला.

‘देवेंद्र फडणवीस हे पुन्हा मुख्यमंत्री होतील’

‘सामान्य माणसासाठी लढणाऱ्या शिवसेनेसोबत लढण्याची भाजपवर वेळ येणार नाही. मात्र, त्यांच्यासोबत जे दोन पक्ष आहेत त्यांच्यासोबत आम्ही संघर्ष नक्की करु, असेही चंद्रकांत पाटील म्हणाले. सुप्रीम कोर्टाने विधीमंडळ नियमाप्रमाणे जर सीक्रेट बॅलेटप्रमाणे अध्यक्षांची निवडणूक घेतली असती तर आज चित्र वेगळे असते, असेही सांगितले. ज्याप्रमाणे रोज रोज हॉटेलमध्ये जेवायचं नसतं. घरचं जेवण खावच लागतं. त्याप्रमाणेच देवेंद्र फडणवीस हे पुन्हा मुख्यमंत्री होतील, याबाबत आमच्या मनात तीळमात्र शंका नाही’, असे चंद्रकांत पाटील म्हणाले. ‘मागच्या पाच वर्षात देवेंद्र फडणवीस यांनी मराठा आरक्षण आणि इतर विषय मार्गी लावलेले आहेत. आघाडी सरकारच्या काळात जे प्रश्न प्रलंबित होते. त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न फडणवीस यांनीच केला’, असेही ते म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -