घरमुंबईराहुल जिथे जातात तिथे पक्ष हरतो हा इतिहास - स्मृती इराणी

राहुल जिथे जातात तिथे पक्ष हरतो हा इतिहास – स्मृती इराणी

Subscribe

भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांसाठी एकूण ९ प्रचार सभा महाराष्ट्रात होणार आहेत, अशी माहिती केंद्रीय महिला आणि बाल कल्याण मंत्री स्मृती इराणी यांनी शुक्रवारी भाजप प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.

विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या कामाला सर्वच राजकीय पक्ष लागले आहेत. याच पार्श्वभूमीवर केंद्रीय महिला आणि बाल कल्याण मंत्री स्मृती इराणी यांनी पुन्हा एकदा काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला आहे. राहुल गांधी हे स्वत:च्याच पक्षासाठी एक अडचण बनले असल्याची टीका स्मृती इराणी यांनी केली आहे. येत्या काही दिवसांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी हे महाराष्ट्रात प्रचार सभा घेणार आहेत. भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांसाठी एकूण ९ प्रचार सभा महाराष्ट्रात होणार आहेत, अशी माहिती केंद्रीय महिला आणि बाल कल्याण मंत्री स्मृती इराणी यांनी शुक्रवारी भाजप प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत दिली. शिवाय, या कालावधीदरम्यान काँग्रेस नेते राहुल गांधी यांची देखील सभा होणार आहे. त्यामुळे ते महाराष्ट्रात येतील. पण, राहुल गांधी जिथे जिथे जातात तिथे त्यांच्या पक्षाला अपयश येतं हा आजवरचा इतिहास असल्याचं स्मृती इराणी यांनी स्पष्ट केलंय.

राहुल गांधी स्वतःच्याच पक्षाची अडचण ठरत आहेत

स्मृती इराणी म्हणाल्या की, “राहुल गांधी यांची तुलना मोदींसोबत केली तेव्हाच त्यांना लोकसभेत पराभव पत्करावा लागला. ज्या महाराष्ट्रात ते सभा घेण्यासाठी येत आहेत ती महाराष्ट्रातील जनता त्यांना अनेक प्रश्न विचारेल, जसे की त्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अपमान का केला? तसंच, राहुल गांधी जिथे-जिथे जातात तिकडे त्यांचा पक्ष हरतो हा आजवरचा इतिहास आहे. राहुल गांधी स्वत:च्या पक्षात ही एक अडचण बनले आहेत.”

- Advertisement -

भाजपच्या विजयासाठी पंतप्रधानांचा दौरा

लोकसभा निवडणुकीत जसा राहुल गांधी यांना अमेठीत आपला पराभव स्विकारावा लागला तसाच तो विधानसभेतही दिसेल. कारण, त्यांच्या पक्षालेखी राहुल गांधी हे अजिबातच सकारात्मक नाहीत. त्यामुळे, यंदाच्या निवडणुकीत जनता त्यांना अनेक प्रश्न विचारेल हे सांगायला स्मृती इराणी विसरल्या नाहीत. येत्या १३ ऑक्टोबरपासून महाराष्ट्रात पंतप्रधान मोदींच्या सभांचा धडाका सुरू होणार आहे. तर, प्रचारांची सांगता १८ ऑक्टोबर रोजी मुंबईत होणार आहे. आणि यावेळेस स्वत: पंतप्रधान भापज विजयी करण्यासाठी महाराष्ट्रात येणार असल्याचंही स्मृती इराणी यांनी स्पष्ट केलं आहे.

पंतप्रधानांच्या सभा कुठे होणार?

  • १३ ऑक्टोबर – जळगाव आणि साकोली येथे रॅली
  • १६ ऑक्टोबर – अकोला , परतूर (जि. जालना), ऐरोली (जि. ठाणे)
  • १७ ऑक्टोबर – परळी (जि. बीड), पुणे , सातारा
  • १८ ऑक्टोबर – मुंबई
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -