घरमुंबईबनावट लायसन्स बनविणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

बनावट लायसन्स बनविणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

Subscribe

आता पर्यंत २४५ लायसन्स बनविल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. तसेच या प्रकरणातील तीनही आरोपींना अटक केली आहे.

५००० रुपये घेऊन बनावट लायसन्स बनविणाऱ्या टोळीचा एपीएमसी पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी दीपक सुर्यवंशी, डेरील लोबो आणि धीरज ऊर्फ नरेंद्र मोर्या अशा तीन आरोपींना अटक केली असून त्यांच्या कडून एकूण १४३ बनावट लायसन्स पोलिसांनी जप्त केले आहेत. वाशी आरटीओ कार्यालय परिसरात एक एजंट ५००० रुपयात बनावट लायसन्स बनवून देत असल्याची गुप्त माहिती एपीएसमी पोलीस ठाण्यातील पोलीस नाईक किरण राऊत यांना मिळाली होती. त्यानुसार वरिष्ठ अधिकाऱ्यांना याची कल्पना देऊन पोलीस कर्मचारी जयदीप पवार यांचे बनावट लायसन्स बनविण्याचे काम या एजंटला देण्यात आले.

पनवेल आणि ठाणे आरटीओचे दोन गोल रबरी स्टॅम्प जप्त

त्याने ५००० रुपये घेऊन जयदीप पवार यांची कुठलीही ही वाहन चालविण्याची कोणतीही चाचणी घेतली नाही. अवघ्या तीन दिवसात पवार यांना लायसन्स बनवून दिले. सदर लायसन्स हे बनावट असल्याची खातर जमा केल्यानंतर एजंट दीपक सूर्यवंशी (वय २५) याच्या विरोधात एपीएमसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपीला कळंबोली येथून अटक करण्यात आली. त्याच्या घराची झडती घेतली असता त्याच्या घरातून १४३ बनावट लायसन्स, दोन आधारकार्ड ४, शाळा सोडल्याचे दाखले, पनवेल आणि ठाणे आरटीओचे दोन गोल रबरी स्टॅम्प, एक पनवेल आरटीओचा चौकोनी स्टॅम्प आणि एक एसके टूर्स अँड ट्रॅव्हल्सचा स्टॅम्प आढळून आले. अधिक तपास केला असता सदर आरोपी हा बनावट लायसन्स एका ईमेल आयडीवर पाठवित होता. त्यानंतर त्याची प्रत तयार करीत होता.

- Advertisement -

हेही वाचा पोलीस निरीक्षकाकडून रशियन महिलेवर वारंवार बलात्कार

इतर आरोपींचा शोध सुरू

सदर मेल आयडी हा पनवेल मधील फिनिक्स झेरॉक्स सेंटरचा होता. त्याप्रमाणे पोलिसांनी फिनिक्स झेरॉक्स सेंटर येथे तपासणी केली असता त्या ठिकाणी १०२ बनावट लायसन्सच्या प्रति मिळून आल्या. तर यातील दुसरा साथीदार डेरील लोबो (वय ५४) राहणार कळंबळी याने बनावट रबर स्टॅम्प तयार केल्याच्या प्रकरणी आणि तिसरा साथीदार धीरज ऊर्फ नरेंद्र मौर्य (वय २५) व्यवसाय मोटार ड्रायव्हिंग स्कूल राहणार कळोंबली येथून अटक करण्यात आली. यातील अजून इतर आरोपींचा शोध सुरू आहे.

- Advertisement -

हेही वाचाठाण्यात ट्रेलरच्या धडकेत महिलेसह तिच्या तीन वर्षीय चिमुकलीचा मृत्यू

सर्वसामान्यांना यामुळे हे बनावट लायसन्स वाटत होते खरे

आरटीओ कार्यालयात लायसन्स नूतनीकरण करतेवेळी जुनी लायसन्स आरटीओ कार्यालयातील स्टोर रूममध्ये ठेवली जायची. मात्र यावर आरोपी दीपक सूर्यवंशी हा नजर ठेवून होता आणि स्टोर रूममध्ये असलेली जुनी लायसन्स चोरून त्यातील चिप तयार करण्यात आलेल्या बनावट लायसन्समध्ये लावायचा. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना हे लायसन्स खरे वाटत असे. त्यामुळे सदर आरोपीने अजून किती असे बनावट लायसन्स बनवून दिले आहेत याचा पुढील तपास एपीएसी पोलीस ठाण्याचे सहा. पोलीस निरीक्षक भूषण पवार करीत आहेत, अशी माहिती परिमंडळ १ चे पोलीस उपआयुक्त पंकज डहाने यांनी दिली.


नक्की वाचाठाण्यात पुन्हा खड्ड्याने घेतला माय-लेकीचा बळी


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -