घरमहाराष्ट्रमुख्यमंत्र्यांच्या शपथविधी सोहळ्याकडे मोदी पाठ फिरवणार?

मुख्यमंत्र्यांच्या शपथविधी सोहळ्याकडे मोदी पाठ फिरवणार?

Subscribe

मागच्यावेळेपेक्षा कमी आमदार निवडून आले, तसेच सत्तास्थापनेला उशीर होत असल्यामुळे नरेंद्र मोदी नाराज..

शिवसेना-भाजपमध्ये मुख्यमंत्री कोण? यावरून सध्या तू तू मै मै सुरू असताना भाजपने आता येत्या ५ नोव्हेंबरला शपथविधी सोहळा उरकून घ्यायचे ठरवले आहे. मात्र या शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार नाहीत, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. राज्यात भाजपला अपेक्षित यश न मिळाल्याने नरेंद्र मोदी नाराज असून, त्यामुळेच ते या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहणार नसल्याचे समजते.

२०१४ ला भाजपला १२२ जागा जिंकण्यात यश आले होते. तसेच तेव्हा पहिल्यांदा भाजपचा मुख्यमंत्री महाराष्ट्रात विराजमान होणार होता. त्यामुळे मोदींसह दिल्लीतील टीम त्यावेळी उपस्थित राहिली होती. मात्र यावेळी भाजपचे सत्तेचे सर्व गणितच बिघडल्याने शिवसेना देखील आक्रमक झाली आहे. या सर्व बाबी लक्षात घेऊनच मोदी उपस्थित राहणार नाहीत, असे एका नेत्याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले. दरम्यान भाजपने शपथविधी सोहळ्यासाठी वानखेडे स्टेडियम निवडले असून, याची सर्व जबाबदारी आमदार प्रसाद लाड यांच्याकडे देण्यात आली आहे.

- Advertisement -
हे वाचा – शिवसेनेला मोठा धक्का; ५ नोव्हेंबरला भाजप मंत्र्यांचा शपथविधी सोहळा!

सगळ्यात महत्वाचे म्हणजे नरेंद्र मोदी जरी येण्याची शक्यता नसली तरी केंद्रीय गृहमंत्री आणि राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा उपस्थित राहणार आहेत. हरयाणा येथे देखील सत्ता स्थापन करण्यासाठी भाजपला अडचणी आल्या होत्या. त्यामुळे तिकडे देखील मोदी गेले नव्हते, त्याच पद्धतीने महाराष्ट्रात देखील मोदी उपस्थित राहणार नाहीत, असे समजते.

चंद्रकांत पाटील यांनाच महसूलमंत्री पद?

दरम्यान खात्रीलायक सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह १३ मंत्री शपथ घेणार असून, यामध्ये गिरीश महाजन, चंद्रकांत पाटील तसेच काही नव्या नेत्यांचा समावेश असेल, अशी माहिती मिळत आहे. एवढेच नाही तर महसूल मंत्री पद चंद्रकांत पाटील यांच्याकडे जाण्याची शक्यता आहे.

हे देखील वाचा – राज्यातील सत्ता घालवू नका; दिल्लीतून मुख्यमंत्र्यांवर वाढला दबाव

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -