घरमहाराष्ट्रशिवसेनेला मोठा धक्का; ५ नोव्हेंबरला भाजप मंत्र्यांचा शपथविधी सोहळा!

शिवसेनेला मोठा धक्का; ५ नोव्हेंबरला भाजप मंत्र्यांचा शपथविधी सोहळा!

Subscribe

येत्या ५ नोव्हेंबरला भाजपच्या मंत्रीमंडळाचा शपथविधी समारंभ पार पडणार आहे. विशेष म्हणजे तोपर्यंत शिवसेनेची मनधरणी करण्यात भाजपला यश आले तर ठिक अन्यथा शिवसेनेशिवाय भाजप मंत्र्यांचा हा शपथविधी सोहळा पार पडणार आहे.

विधानसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्राच्या राजकारणात सुरु असलेले राजकीय नाट्य काही केल्या कमी होताना दिसत नाही. निवडणूक निकालाच्या अठवडाभरानंतरही शिवसेना-भाजपचा सत्ता स्थापनेचा तिढा अजूनही सूटलेला नाही. दोन्ही पक्ष मुख्यमंत्रीपदावर अडून बसले आहेत. त्यामुळे सत्ता स्थापनेचा पेच कठीण होत चालला आहे. मात्र, या सर्व घडामोडींनंतरही भाजप पूर्णपणे सत्ता स्थापनेच्या तयारीत असल्याची माहिती सुत्रांकडून मिळत आहे. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ५ नोव्हेंबरला भाजपच्या मंत्रीमंडळाचा शपथविधी समारंभ पार पडणार आहे. विशेष म्हणजे तोपर्यंत शिवसेनेची मनधरणी करण्यात भाजपला यश आले तर ठिक अन्यथा शिवसेनेशिवाय भाजप मंत्र्यांचा हा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. या शपथविधी समारंभाच्या नियोजनाची जबाबदारी आमदार प्रसाद लाड आणि चंद्रकांत देसाई यांच्याकडे देण्यात आली आहे.


हेही वाचा – ‘राज्यपाल ‘राक्षस’ आहेत’, मुख्यमंत्र्यांचं धक्कादायक विधान!

- Advertisement -

 

शिवसेनेच्या भूमिकेवर संपूर्ण देशाचे लक्ष

मुख्यमंत्री पदावरुन भाजप आणि शिवसेना यांच्यातील मतभेद पुन्हा एकदा टोकाला गेले आहेत. शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी भाजपला शह देऊन एकहाती सत्ता स्थापन करण्याचा दावा केला आहे. तर दुसरीकडे भाजपने मंत्रीमंडळाच्या शपथविधीसाठी तयारी सुरु केली असल्याची माहिती सुत्रांकडून मिळत आहे. येत्या ५ नोव्हेंबरला मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर भाजप मंत्रीमंडळाचा शपथविधी समारंभ पार पडणार आहे. विशेष म्हणजे शिवसेना सोबत आली तर ठिक अन्यथा शिवसेनेशिवाय हा मंत्रीमंडळ सोहळा पार पडणार आहे. त्यामुळे जर खरच भाजपच्या मंत्रीमंडळाचा शपथविधी सोहळा पार पडला तर शिवसेनेला मोठा झटका बसणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. दरम्यान, शिवसेना यावर काय भूमिका घेणार, याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागलेले आहे.

- Advertisement -

हेही वाचा – राज्यातील सत्ता घालवू नका; दिल्लीतून मुख्यमंत्र्यांवर वाढला दबाव


 

अगोदर शपथविधी मग सत्तेत भाजप सहभागी होणार?

सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात सुरु असलेल्या घडामोडींवर वेगवेगळे तर्कवितर्क लावले जात आहेत. दरम्यान, २०१४ साली भाजपच्या मंत्र्यांचा शपथविधी समारंभ पार पाडल्यानंतर दीड महिन्यांनी शिवसेना पक्ष सत्तेत सहभागी झाला होता. आतादेखील भाजप अगदी तशाचप्रकारे राजकीय खेळी करणार का? असा प्रश्न राजकीय वर्तुळात उपस्थित केला जात आहे. २०१४ साली भाजपकडे सत्ता स्थापन करण्याइतपत संख्याबळ नव्हते. मात्र, तरीही भाजपच्या मुख्यमंत्र्यांसह इतर १० महत्त्वाच्या मंत्र्यांचा शपथवीधी सोहळा पार पडला होता. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसने बाहेरुन भाजपला पाठिंबा दिला होता आणि आवाजी मतदानाच्या मदतीने भाजपने बहुमत सिद्ध केले होते. त्यानंतर महिन्याभरानंतर शिवसेना स्थिर सरकारमध्ये सामील झाली होती. आता देखील भाजप अशीच खेळी करणार का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. मात्र, यावर आता शिवसेनेची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. कारण २०१४ साली शिवसेना विरोधी पक्षाच्या बाकावर बसली होती. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे विरोधीपक्षनेते बनले होते. मात्र, काही दिवसांनी त्यांनी भाजपसोबत स्थिर सरकार स्थापन केले होते.

हे देखील वाचा – मुख्यमंत्र्यांच्या शपथविधी सोहळ्याकडे मोदी पाठ फिरवणार?

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -