घरमहाराष्ट्र'शिवसेनेचे आमदार फुटणार'; अजित पवारांच्या भेटीनंतर रवी राणा यांचा दावा

‘शिवसेनेचे आमदार फुटणार’; अजित पवारांच्या भेटीनंतर रवी राणा यांचा दावा

Subscribe

भाजपला पाठिंबा देण्यासाठी शिवसेनेचे सर्वाधिक आमदार फुटणार, असा दावा भाजपप्रणीत अपक्ष आमदार रवी राणा यांनी केला आहे. रवी राणा यांनी आज राष्ट्रवादीचे बंडखोर नेते अजित पवार यांची भेट घेतली. या बैठकीनंतर त्यांनी प्रसारमाध्यमांना दिलेल्या मुलाखतीत शिवसेनेचे आमदार फुटणार असल्याचा दावा केला. ‘शिवसेनेत मोठ्या प्रमाणात अस्थिरता आहे. बरेच आमदार नाराज आहेत. अनेक आमदारांचा पक्षाकडून छळ केला जात आहे. त्यामुळे त्या त्रासाला कंटाळून ते भाजपात प्रवेश करतील आणि भाजपला १७६ पेक्षा जास्त बहुमत मिळेल’, असे राणा म्हणाले.


हेही वाचा – महाराष्ट्रात तोडाफोडीचे राजकारण? भाजपच्या ‘ऑपरेशन लोटस’ची जबाबदारी दिग्गजांकडे

- Advertisement -

भाजपचे ‘ऑपरेशन लोटस’ सुरु?

अजित पवार यांनी भाजपसोबत हातमिळवणी करत राज्यात सत्ता स्थापनेचा दावा केला. शनिवारी सकाळी भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री तर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यावेळी अजित पवार यांनी राज्यपालांकडे राष्ट्रवादीच्या ४१ आमदारांचे स्वाक्षरी असलेले पत्र सादर केले होते. मात्र, ते स्वाक्षरी पक्ष शिवसेनाला सत्ता स्थापनेला पाठिंबा देण्यासाठी तयार करण्यात आले होते, असा खुलासा राष्ट्रावादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत केला. दरम्यान, राज्यपालांनी भाजपला सरकार स्थापन करण्यासाठी ३० नोव्हेंबरची मुदत दिली आहे. हेच बहुमत सिद्ध करण्यासाठी भाजपकडून वेगवेगळ्या प्रकारे प्रयत्न केले जात आहे. विशेष म्हणजे शिवसेनेतले आमदार फोडण्यासाठी भाजपकडून आता ‘ऑपरेशन लोटस’ सुरु करण्यात आले असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.


हेही वाचा – अजित पवारांची मनधरणी करण्यात राष्ट्रवादीला अपयशच

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -