घरमहाराष्ट्रमुंडे भाऊ-बहिणीच्या भांडणावर शरद पवार यांची पहिली प्रतिक्रिया

मुंडे भाऊ-बहिणीच्या भांडणावर शरद पवार यांची पहिली प्रतिक्रिया

Subscribe

दोन दिवसांपूर्वी धनंजय मुंडे यांचा भाषणाचा एक व्हिडिओ सोशल माडियावर व्हायरल झाला होता. या व्हिडिओमध्ये ते आपल्या चुलत बहिण आणि परळी मतदारसंघाच्या भाजपच्या उमेदवार पंकजा मुंडे यांच्यावर आक्षेपार्य शब्दांत टीका करताना दिसत होते. यावर शरद पवार यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

गेल्या काही दिवसांपासून राज्यभरात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु होती. ही रणधुमाळी अंतिम टप्प्यावर आली असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे परळी मतदारसंघाचे उमेदवार धनंजय मुंडे यांचा एक व्हिडिओ समोर आला. या व्हिडिओमध्ये धनंजय मुंडे आपल्या चुलत बहिण आणि परळी मतदारसंघाच्या भाजपच्या उमेदवार पंकजा मुंडे यांच्यावर आक्षेपार्य शब्दांत टीका करताना दिसत होते. या व्हिडिओवरुन मुंडे भाऊ-बहिणीमध्ये मोठा वाद उफाळला होता. मात्र, धनंजय मुंडे यांनी आपण तशाप्रकारचे वक्तव्य केले नसून व्हायरल होणारी व्हिडिओ क्लीप बनावट असल्याचे म्हटले. आता याच पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. ‘बहिणाबाई या शब्दामध्ये आदर आहे. त्यामुळे या शब्दावर आक्षेप घेण्यासारखे काही नाही’, असे शरद पवार म्हणाले आहेत.

नेमके काय म्हणाले शरद पवार?

‘मी पंकजा मुंडे यांचे एक स्टेटमेंट पाहिले. त्यामध्ये पंकजा मुंडे म्हणत आहेत की, त्यांनी माझा उल्लेख बहिणाबाई असा केला. हा शब्द काही योग्य नाही. बहिणाबाई असा उल्लेख करणे योग्य नाही. हे वक्तव्य मला अतिशय यातना देणारे आहे वगैरे असे त्या म्हणाल्याचे मी ऐकले आहे. मला वाटते बहिणाबाई या शब्दामध्ये एक आदर आहे. महाराष्ट्रामधील बहिणाबाईंच्या कविता आम्ही लहानपणी घोकल्या आहेत. बहिणाबाईंनी अनेक विचार त्यांच्या कवितामधून मांडल्या. त्याचा स्वीकार महाराष्ट्राच्या साहित्य क्षेत्राने अगदी आनंदाने केला. त्यामुळे बहिणाबाई या नावातच आदर आहे. त्यामुळे बहिणाबाई या शब्दामुळे यातना का होतात आणि चक्कर का येतात? तेच मला कळत नाही. ३० ते ४० मिनिटे भाषण करताना काही होत नाही आणि शेवटी चक्कर येते. आता यामागे काय आहे काही कळत नाही’, असे शरद पवार म्हणाले.

- Advertisement -

हेही वाचा – Maharashtra Assembly: पुण्यात ‘कँडल लाईट’ वोटिंग!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -