घरमहाराष्ट्रशिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडीचे नवीन नाव ठरलं!

शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडीचे नवीन नाव ठरलं!

Subscribe

महाराष्ट्रात सत्ता स्थापन करण्यासाठी काँग्रेस हायकमांडकडून अखेर हिरवा कंदील दाखिवण्यात आला आहे. राज्यात पहिल्यांदाच शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी हे पक्ष एकत्र येऊन सत्ता स्थापन करण्याचा प्रयत्न करत आहेत. माध्यामांनी या तीनही पक्षांच्या आघाडीला वेगवेगळी नावे दिली होती. महाशिवआघाडी आणि महासेनाआघाडी अशी नावांचा उल्लेख केला जात होता. मात्र या नव्या आघाडीला महाराष्ट्र विकास आघाडी नाव दिले जावे, अशी अपेक्षा काँग्रेसच्या नेत्यांकडून व्यक्त केली जात आहे.

काल दिवसभर बैठकांचे सत्र झाल्यानंतर आजही दिल्लीत काँग्रेस-राष्ट्रवादीच्या स्वतंत्र बैठका सुरु झाल्या आहेत. तत्पूर्वी काल झालेल्या बैठकीत काँग्रेसच्या नेत्यांनी शिवसेनेसोबत जाण्यास सहमती दर्शवली असली तरी आघाडीच्या नावात शिवसेनेचे नाव घेण्याबाबत आक्षेप नोंदवले आहेत. शिवसेना प्रखर हिंदुत्त्वाचा पुरस्कार करते, तर काँग्रेस धर्मनिरपेक्षा विचारांची आहे. त्यामुळे आघाडीच्या नावात शिवसेनेचा उल्लेख टाळून ‘महाविकासआघाडी’ असे नाव या नव्या आघाडीला देण्यात येणार आहे, अशी माहिती काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी दिली.

- Advertisement -

दोन किंवा अधिक पक्ष एकत्र येऊन निर्माण झालेल्या आघाडीला देशात नावे देण्याचा प्रकार आहे. आतापर्यंत भाजप-शिवसेना आघाडीला युती आणि काँग्रेस-राष्ट्रवादीला आघाडी असे नाव दिले जात होते. शिवसेना काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडीत सामील होत असल्यामुळे या आघाडीला महाशिवआघाडी असे नाव देण्यात येत होते. मात्र आघाडीमध्ये शिवसेनेचा उल्लेख नको, अशी भूमिका काही काँग्रेस नेत्यांनी मांडली. तसेच काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडीत इतरही छोट्या छोट्या पक्षांचा समावेश आहे. त्यामुळे त्यांनाही आपलासा वाटेल असा विकास हा शब्ध महाआघाडीत टाकण्याचा विचार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -