घरमहाराष्ट्रआज भाजप-शिवसेनेची सत्व परीक्षा; अन्यथा युतीच्या उमेदवारांना फटका

आज भाजप-शिवसेनेची सत्व परीक्षा; अन्यथा युतीच्या उमेदवारांना फटका

Subscribe

भाजप आणि शिवसेनेची युती झाली असली तरी राज्यात युतीसाठी पूरक असे वातावरण सध्यस्थितीत दिसत नाही. त्यामागील कारणही अगदी तसेच आहे. राज्यात चंद्रपूर जिल्हा सोडला तर प्रत्येक जिल्ह्यात शिवसेना आणि भाजप पक्षाच्या बंडखोरांनी युतीच्या उमेदवाराला आव्हान दिले आहे. या बंडखोरांचा फार मोठा फटका युतीच्या उमेदवाराला बसण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे बंडखोरांची मनधरणी करण्याचे मोठे आव्हान दोन्ही पक्षांना असणार आहे. दरम्यान, आज म्हणजे सोमवारी विधानसभा निवडणुकीचा उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे. आज बंडखोरांची मनधरणी करण्यात शिवेसेना आणि भाजपला यश आले नाही, तर त्याचा मोठा फटका युतीच्या उमेदवारांना बसणार आहे.

हेही वाचा – भाजपच्या सर्वाधिक २७ मतदारसंघात बंडखोर

- Advertisement -

कोकणात खरच युती आहे का?

राज्यातील जवळपास सर्वच जिल्ह्यांमध्ये भाजप आणि शिवसेनेच्या नेत्यांनी युतीच्या उमेदवारांच्या विरोधात अर्ज दाखल करुन बंडखोरी केली आहे. मात्र, काही भागांमध्ये भाजप आणि शिवसेनेत उघडपणे लढत बघायला मिळत आहे. महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष नारायण राणे यांचे पुत्र नितेश राणे यांनी भाजपात प्रवेश केला असून भाजपकडून त्यांना कणकवली मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. मात्र, शिवसेनेने त्या मतदारसंघात नितेश यांचा पूर्वीचा निकटवर्तीय सतीश सावंत यांचा शिवसेनेत प्रवेश करुन त्यांना उघडपणे पाठिंबा दर्शवल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे. कोकणात फक्त याच मतदारसंघात नाही तर रत्नागिरी जिल्ह्यातील चार आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तीनही मतदारसंघात उघडपणे बंडखोरी पहायला मिळत आहे. कोकणातील ही वस्तुस्थिती पाहता खरच युती आहे का? असा प्रश्न निर्माण होतो.

वांद्रे पूर्व मतदारसंघात शिवसेनेतच बंडखोरी

गेल्या काही दिवसांपासून भाजप आणि शिवसेना यांच्यातील संबंध ताणले गेले होते. त्यामुळे युतीची उद्घोषणा झाली असली तरी बंडखोरी होणे साहजिकच आहे. मात्र, त्याही पलिकडे वांद्रे पूर्व मतदारसंघात वेगळे चित्र पहायला मिळत आहे. या मतदारसंघात शिवसेनेकडून महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. त्यामुळे या मतदारसंघातील विद्यमान आमदार तृप्ती सावंत नाराज झाल्या आहेत. शिवसेनेकडून उमेदवारी न मिळाल्यामुळे त्यांनी अपक्ष अर्ज भरला आहे. आज अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे. शिवसेनेला त्यांची नाराजी दूर करण्यात यश आले नाही तर त्याचा फटका शिवसेनेला बसू शकतो.

- Advertisement -

आयात उमेदवारांमुळे जुने कार्यकर्ते नाराज

आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना आणि भाजप दोन्ही पक्षांमध्ये राष्ट्रवादी आमि काँग्रेस पक्षातील मोठमोठे नेते आले आहेत. मात्र, या नेत्यांमुळे पक्षातील जुन्या कार्यकर्त्यांची उमेदवारींची संधी हुकली आहे. त्यामुळे ते नाराज झाले आहेत.

मुख्यमंत्र्यांचे बंडखोरांना फोन

दरम्यान, आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही बंडखोरांना फोन केली आहे. मुख्यमंत्र्यांकडून त्यांचे मनधरणी करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. आता त्यांना कितपत यश मिळेल, ते पाहणे महत्त्वाचे ठरेल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -