घरताज्या घडामोडीकुणीही आंदोलनं किंवा मोर्चे काढू नयेत, इंदुरीकर महाराजांचे आवाहन

कुणीही आंदोलनं किंवा मोर्चे काढू नयेत, इंदुरीकर महाराजांचे आवाहन

Subscribe

किर्तनकार इंदुरीकर महाजारांवर कायद्यानुसार गुन्हा दाखल करा अशी मागणी अंधश्रद्धा निर्मुलन समितीने केली आहे. तर दुसरीकडे त्यांना समर्थन देणारे फलकही झळकावले जात आहेत. यावर कुणीही आंदोलनं आणि मोर्चे काढू नयेत असे आवाहन इंदुरीकर महाराजांनी केले आहे.

पुत्रप्राप्तीसाठी सम-विषम तिथीचा फॉर्म्युला किर्तनातून सांगितल्याने प्रसिद्ध किर्तनकार इंदुरीकर महाराज हे चांगलेच अडचणीत आले आहेत. इंदुरीकर महाजारांवर कायद्यानुसार गुन्हा दाखल करा, अशी मागणी अंधश्रद्धा निर्मूलन समितीने केली आहे. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने एक पत्र पाठवून त्याद्वारे ही मागणी केली आहे. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या लेटरहेडवर हा अर्ज करण्यात आला आहे. तर दुसरीकडे कुणीही आंदोलनं आणि मोर्चे काढू नयेत, असे आवाहन इंदुरीकर महाराजांनी केले आहे.

काही दिवसांपूर्वी कीर्तनकार इंदुरीकर महाराज यांच्या कीर्तनाच्या कार्यक्रमाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यात ‘सम तिथीला स्त्री संग केल्यास मुलगा होतो आणि विषम तिथीला स्त्री संग केल्यास मुलगी होते’ असं इंदुरीकर महाराजांनी म्हटलं होतं. ‘अशुभ वेळेला स्त्री संग झाल्यास अवलाद रांगडी, बेवडी आणि खानदानाचं नाव मातीत मिळवणारी होते. रावणाचा जन्म आणि प्रल्हादाचा जन्म ही दोन उदाहरणंही आहेत’, असं इंदुरीकर महाराजांनी म्हटलं होतं. त्यांच्या याच वक्तव्यावरुन वाद निर्माण झाला आहे.

- Advertisement -

महाराज कीर्तन सोडून करणार शेती

या सगळ्या प्रकारानंतर इंदुरीकर महाराजांनी उद्विग्नता व्यक्त करत कीर्तन सोडून शेती करणार असल्याचं सांगितलं होतं. त्यामुळे त्यांच्या चाहत्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली होती. इंदुरीकर महाराजांच्या कीर्तन कार्यक्रमात त्यांच्या समर्थकांनी आणि चाहत्यांनी त्यांना समर्थन देणारे फलकही झळकावले होते. ‘आमचा इंदुरीकर महाराजांना पाठिंबा’ अशी मोहीमच सुरू झाली आहे. काही ठिकाणी तर समर्थकांनी इंदुरीकर महाराजांसाठी आंदोलन, मोर्चे काढण्याची तयारी सुद्धा दाखवली आहे. मात्र, इंदुरीकर महाराजांनी त्यांना आंदोलनं आणि मोर्चे काढण्यापासून रोखलं आहे. ११ फेब्रुवारीला ही बाब समोर आली होती. तेव्हापासून हा वाद सुरु झाला. आता अंनिसनेही इंदुरीकर महाराजांवर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी केल्याने त्यांच्या अडचणी वाढल्या आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -