घरक्राइमSBI च्या ग्राहकांना केलं जातंय टार्गेट, बँकेचा ग्राहकांना इशारा!

SBI च्या ग्राहकांना केलं जातंय टार्गेट, बँकेचा ग्राहकांना इशारा!

Subscribe

ऑनलाईन फसवणुकीचे प्रकार घडले की अनेकांना आठवते ती जमताडा नावाची वेबसीरिज. आजही भारतात होणाऱ्या ऑनलाईन फसवणुकीच्या अनेक घटना या जमताडामधूनच घडत असतात. पण अशा घटना ऐकून, वाचून किंवा पाहून देखील आजही अनेक सामान्य ग्राहक अनोळखी फोन कॉलवर आपले बँकिंग डिटेल्स अगदी सहज देत आहेत. त्यासाठीच आता SBI नं आपल्या बँकेच्या ग्राहकांना आणि इतर बँकेच्या ग्राहकांना देखील सतर्कतेचा इशारा दिला आहे. गेल्या काही दिवसांमध्ये SBI च्या ग्राहकांना एका विशिष्ट लॉटरीचे विजेते झाल्याचे व्हॉट्सअप कॉल येत आहेत. या पार्श्वभूमीवर SBI नं आपल्या ट्वीटर अकाऊंटवरून यासंदर्भात ट्वीट करून आपल्या ग्राहकांना सूचित केलं आहे.

अशी होते फसवणूक!

ऑनलाईन फसवणूक करणारी ही टोळी सध्या एसबीआयच्या ग्राहकांना व्हॉट्सअॅप कॉल करत आहे. कारण व्हॉट्सअॅप कॉल रेकॉर्ड करता येत नाहीत. त्यानंतर या ग्राहकांना बँकेचा सांगून एका क्रमांकावर अधिक माहितीसाठी फोन करायला सांगितलं जातं. आणि तिथून पुढे हळूहळू ग्राहक त्यांच्या जाळ्यात अडकत जातो. या प्रक्रियेमध्ये ग्राहकाची वैयक्तिक आणि बँक अकाऊंटशी संबंधित माहिती मिळवली जाते आणि त्याद्वारे त्याला आर्थिक गंडा घातला जातो. त्यामुळे असा कॉल आलाच, तर त्याची खातरजमा करण्यासाठी थेट बँकेत फोन करून चौकशी करून घ्यावी, असं आवाहन देखील बँकेकडून करण्यात आलं आहे.

- Advertisement -

काय म्हटलंय ट्वीटमध्ये?

‘आता ग्राहकांना व्हॉट्सअॅपवरून टार्गेट केलं जात आहे. अशा सायबर गुन्हेगारांना तुम्हाला मूर्ख बनवू देऊ नका. सतर्क राहा आणि लक्ष ठेवा’, असं या ट्वीटमध्ये म्हटलं आहे. तसेच, यासोबत काही मार्गदर्शक सूचना असणारा फोटो देखील ट्वीट करण्यात आला आहे. यामध्ये हे सायबर गुन्हेगार कशा पद्धतीने फसवणूक करत आहेत आणि त्यावर आपण काय करायला हवं, याविषयी सूचना दिल्या आहेत.

१. सायबर गुन्हेगार ग्राहकांना व्हॉट्सअॅप कॉल आणि मेसेज करून टार्गेट करत आहेत.
२. एसबीआय ग्राहकांची वैयक्तिक किंवा बँक अकाऊंटशी संबंधित असलेली माहिती मिळवण्यासाठी कधीही ग्राहकांना कॉल, इमेल, एसएमएस किंवा व्हॉट्सअॅप करत नाही.
३. एसबीआयमध्ये कोणत्याही प्रकारची लॉटरी किंवा लकी कस्टमर गिफ्ट ऑफर सुरू नाही. त्यामुळे अशा गोष्टींपासून सावध राहा.
४. तुमची एक चूक तुम्हाला या सायबर गुन्हेगारांच्या जाळ्यात अडकवू शकते. त्यामुळे अशा फेक कॉल किंवा मेसेजेसला फसू नका.
५. हा संदेश शक्य तितक्या लोकांपर्यंत पोहोचवा. जेणेकरून त्यांचा अशा फसवणुकीपासून बचाव होईल.

- Advertisement -

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -