Thursday, January 14, 2021
27 C
Mumbai
घर क्राइम 'पॉर्न' पाहून तरुणाने केला ६० वर्षाच्या विधवा महिलेवर बलात्कार

‘पॉर्न’ पाहून तरुणाने केला ६० वर्षाच्या विधवा महिलेवर बलात्कार

'पॉर्न' पाहून एका तरुणाने मित्राच्या ६० वर्षीय विधवा आईवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

Related Story

- Advertisement -

केवळ मुलगा-आईच्या नात्यालाच नव्हे तर, संपूर्ण मानवतेलाच काळीमा फासणारी अशी घटना राजस्थानमध्ये घडली आहे. राजस्थानच्या अलवर जिल्ह्यातील शाहजहांपूर परिसरात एका २१ वर्षीय तरुणाने पॉर्न पाहून ६० वर्षाच्या विधवा असलेल्या मित्राच्या आईवर बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे आरोपीने प्रकरण दडपण्याच्या हेतूने बलात्कारानंतर पीडित वृद्ध महिलेची हत्या करण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी आरोपी विकास याला अटक करण्यात आली आहे.

नेमके काय घडले?

अलवर जिल्ह्यातील शाहजहांपूर परिसरात पॉर्न व्हिडिओ पाहण्याच्या आहारी गेलेल्या एका २१ वर्षीय तरुणाने लज्जास्पद प्रकार केला आहे. रविवारी रात्री १०.३० वाजण्याच्या सुमारास आरोपी विकास यांनी पॉर्न व्हिडिओ पाहिला आणि ६० वर्षीय मित्राच्या आईवर नशेत बलात्कार केला. त्यानंतर पीडित वृद्ध महिलेची हत्या करण्याच्या उद्देशाने तिला जखमी केले आणि त्यानंतर महिलेला खोलीत बंद करुन घटनास्थळावरुन पळ काढला.

- Advertisement -

दरम्यान, रात्री वृद्ध महिलेचा आरडाओरडा ऐकून कुटुंबियांसह ग्रामस्थांनी पीडितेकडे धाव घेतली. त्यानंतर पीडितेला शाहाजहांपूर रुग्णालयात दाखल करण्यात आले. नंतर पोलिसांनी शाहाजहांपूर येथे महिला डॉक्टर नसल्यामुळे बर्डोद रुग्णालयामध्ये वैद्यकीय तपासणी केली. या घटनेमध्ये पीडित महिला जखमी झाली असून आरोपी विकासला अटक करण्यात आली आहे.


हेही वाचा – चहाच्या एका घोटानं गेला पतीचा जीव; पत्नीच्या एका चुकीने हसतं-खेळतं घर झालं उद्धस्त


- Advertisement -