घरक्राइमधक्कादायक! पत्नीला छेडणाऱ्या व्यक्तीचं पतीनं कापलं डोकं आणि...

धक्कादायक! पत्नीला छेडणाऱ्या व्यक्तीचं पतीनं कापलं डोकं आणि…

Subscribe

पतीचा राग अनावर झाल्याने उचलंल टोकाचं पाऊल

एका व्यक्तीच्या पत्नीची काही माणसांची छेड काढली. त्यावेळी या महिलेच्या पतीला राग अनावर झाला आणि तो संतापला. नंतर त्याने तीन लोकांसह विनयभंग करणार्‍याचे देखील डोके कापले. या धक्कादायक प्रकारानंतर त्याचं डोकं छाटून ४ किलोमीटर लांब जाऊन फेकले. हा खळबळजनक प्रकार उत्तरप्रदेशातील देवरिया येथील आहे. उत्तर प्रदेशच्या देवरिया येथे मृतदेह सापडल्याची खळबळजनक घटना उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी एका महिलेसह चार आरोपींना अटक केली आहे. पत्नीचा विनयभंग केल्याचे उघडकीस आल्यानंतर या घटनेत मरण पावलेल्या व्यक्तीसह निकलोसने इतर दोन साथीदारांसह मृतक राजू स्वांसी नावाच्या व्यक्तीचे फावड्याने गळा कापून धड वेगळे केले आणि डोकं चार किलोमीटर अंतरावर फेकून दिले.

या घटनेत निकलोसच्या पत्नीनेही पुरावे मिटविण्यात मदत केली. ही हत्या करण्यासाठी वापरलेल्या साहित्यांपैकी फावडे, चाकू, दोरी पोलिसांनी जप्त केले. हे सर्व जण पोल्ट्री फार्ममध्ये काम करत असून ते रांचीचे रहिवासी असल्याची माहिती मिळतेय. तपासादरम्यान असे समोर आले की, मृत राजू स्वांसीने निकलोसच्या पत्नीची छेडछाड केली व तिच्यावर जबरदस्ती केल्यानंतर पत्नीने विरोध केला. जेव्हा निकोलसला हे कळले तेव्हा त्याने त्याच्या इतर दोन सहकाऱ्यांसह चाकूने गळा कापण्याचा प्रयत्न केला. चाकूने गळा कापला गेला नाही तर त्याने फावड्याच्या सहाय्याने शरिरापासून डोकं वेगळे केले.

- Advertisement -

रामपूर पोलिस ठाण्यातील मंगलराव मांझरिया, बरईपुर गावाजवळ एका युवकाचा शिरच्छेद केल्याने डोके नसलेला मृतदेह आढळून आला. माहिती मिळाल्यावर पोलिस डॉग स्क्वॉड टीमसह या व्यक्तीचे डोकं शोधण्याचा प्रयत्न केला. ४ किमी अंतरावर बेलवा बाजार जवळील ऊस शेतात हे डोके पोलिसांना मिळाले. त्यानंतर तपास सुरू असताना राजू स्वांसीचे हे डोके आहे, अशी ओळख पटली. राजू झारखंडच्या खूंटी जिल्ह्यातील लॉन्तुपचा रहिवासी होता. दरम्यान, एसपी डॉक्टर श्रीपती मिश्रा यांनी सांगितले की, २ नोव्हेंबरला रामपूर कारखाना स्टेशन परिसरात डोकं नसणारा मृतदेह सापडला. बऱ्याच तपासानंतर त्याचे डोके परत शोधण्यास यश मिळाले. पोलिसांच्या कुत्र्याच्या मदतीने हे ठिकाण शोधण्यात आले. त्यात, रांचीचा रहिवासी असलेली एक व्यक्ती घटनास्थळी आला असल्याचे समोर आले.


सरकार नितीश कुमारांचं पण सर्वात मोठा पक्ष तेजस्वी यादव यांचा
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -