जम्मू-काश्मीर: श्रीनगरमध्ये सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत तीन दहशतवादी ठार

अजूनही सुरक्षा दलाच्या जवानांची अतिरेक्यांशी चकमक सुरुच आहे.

श्रीनगरमध्ये सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत तीन दहशतवादी ठार झाल्याचे समोर येत आहे. याबाबत एएनआयच्या वृत्तसंस्थेने माहिती दिली आहे. एएनआयने केलेल्या ट्विटनुसार श्रीनगरच्या बटमालू भागात चकमक सुरू आहे. पोलीस आणि सीआरपीएफचे जवान तैनात असून दहशतवद्यांचा शोध सुरू आहे.

यापू्र्वी मंगळवारी जम्मू-काश्मीर पोलिसांनी हिजबुल मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेच्या टोळीचा पर्दाफाश केला होता. काश्मीरमधील तीन तरुणांची संघटना पाकिस्तानी दहशतवाद्यांच्या संपर्कात असल्याची माहिती मिळाली होती, असे पोलिसांनी सांगितले. माहितीनुसार, गुटलीबागचा रहिवाशी अर्शिद अहमद खान, गांदरबलचा रहिवाशी माजिद रसूल आणि मोहम्मद आसिफ अशी या तिन्ही तरुणांची नावे आहेत. हे तिघेही पाकिस्तानी दहशतवादी फैयाज खान याच्या संपर्कात होते. तो त्यांना दहशतवादी कारवाया करण्याचा सूचना देत असत.

या ऑपरेशसाठी गांदरबल पोलीस आणि ५ आरआरच्या संयुक्त पथाने कारवाई केली. अटकेनंतर तिघांची चौकशी केली असता, त्यांच्या जागेवरील शस्त्रे आणि विद्युत उपकरणे जप्त करण्यात आली. या संघटनेला पाकिस्तानी आकाकडून आसपासच्या सुरक्षा दलांवर हल्ला करण्याची सूचना दिली जात होती. आता या तिघांविरोधात गांदरबल पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

या संपूर्ण कारवाईची माहिती देताना गांदरबल एसएसपी खलील अहमद पोसवाल म्हणाले की, ‘खोऱ्यातील तरुणांना सूचना करून सीमेपलीकडे बसलेले दहशतवादी त्यांच्या संघटनांमध्ये सामील होण्याचा प्रयत्न करत असतात. त्यांच्याशी विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मद्वारे संपर्क साधला जातो आणि तरुणांच्या पालकांना त्याबद्दल माहितीही नसते. सध्या पोलीस यासंदर्भात सखोल तपास करत आहेत.’


हेही वाचा – तीनही सैन्यात कोरोनाबाधितांचा आकडा १९ हजारांच्या पार; ३५ जणांचा मृत्यू