घरदेश-विदेश४३ कोटींचा घोटाळा फारुख अब्दुल्लांची ईडीमार्फत चौकशी

४३ कोटींचा घोटाळा फारुख अब्दुल्लांची ईडीमार्फत चौकशी

Subscribe

जम्मू-काश्मीरमध्ये 43 कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) सोमवारी नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारुख अब्दुल्ला यांची चौकशी केली. ईडी सध्या जम्मू-काश्मीर क्रिकेट असोसिएशनशी संबंधित घोटाळ्याचा तपास करत आहे. फारुख अब्दुल्ला यांचे पुत्र आणि माजी मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांनी राजकीय सुडातून ही चौकशी होत असल्याचा आरोप केला आहे. उमर म्हणाले, गुपकार घोषणा करत जम्मू-काश्मीरमध्ये महाआघाडी तयार झाल्यानेच सरकारकडून ही सुडाची कारवाई केली जात आहे.

जम्मू-काश्मीर क्रिकेट असोसिएशनशी संबंधित हा घोटाळा 43 कोटींचा असल्याचं सांगितलं जात आहे. जम्मू-काश्मीर क्रिकेट असोसिएशनच्या 10 सदस्यांमध्ये फारूख यांचाही समावेश होता. त्यांच्यावर 2005 ते 2012 दरम्यान, अनेक बनावट खात्यांचा उपयोग करून पैशांचा अपहार केल्याचा आरोप आहे.

- Advertisement -

ईडीच्या कारवाईनंतर उमर अब्दुल्ला यांनी ट्विट केलं, ‘नॅशनल कॉन्फरन्स पक्ष ईडीने पाठवलेल्या समन्सचं उत्तर देईल. गुपकार घोषणा करत जम्मू काश्मीरमध्ये महाआघाडी तयार झाल्यानेच राजकीय सुडासाठी ही कारवाई केली जात आहे.’ यावेळी उमर अब्दुल्ला यांनी फारुख अब्दुल्ला यांच्या घरावर कोणतीही धाड टाकली नसल्याचंही स्पष्ट केलं.

काय आहे घोटाळा
जम्मू-काश्मीर क्रिकेट असोसिएशनशी संबंधित हा घोटाळा 2012 मध्ये समोर आला होता. तेव्हा असोसिएशनचे कोषाध्यक्षांनी पोलिसांकडे याबाबत तक्रार दाखल केली होती. यात माजी महासचिव मोहम्मद सलीम खान आणि माजी कोषाध्यक्ष एहसान मिर्जा यांच्यावर आरोप करण्यात आले होते. यानंतर या घोटाळ्यात एकापाठोपाठ 50 नावं जोडली गेली. यानंतर अब्दुल्ला यांनी असोसिएशनच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. ते 30 वर्षांपासून या पदावर होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -