घरदेश-विदेशस्मार्टफोनमुळे बचावले प्राण

स्मार्टफोनमुळे बचावले प्राण

Subscribe

स्मार्टफोनमुळे प्राण बचावल्या घटना पहिल्यांदाच समोर आली आहे. बाणाने हल्ला करणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी अटक केली आहे.

मोबाईल फोन वापरणे हे आरोग्या धोकादायक असल्याचे सांगितले जाते. मोबाईल फोन्सच्या बॅटरीत स्फोट झाल्यामुळे अनेकांना दुखापत झाल्याच्या घटना समोर आल्या आहे. मात्र मोबाईलमुळे एकाचा प्राण बचावल्याची घटनी ऑस्ट्रेलिया येथे घडली आहे. ४३ वर्षीय माणसाला मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या माणसाचा बाण हा मोबईलमध्ये घूसल्यामुळे त्याचे प्राण बचावले आहे. पोलिसांनी या घटनेची चौकशी करून आरोपीला अटक करण्यात आली आहे. बाण शरीराला लागला नाही तरीही शरीराला इजा झाली असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

A man has been charged after he allegedly fired a bow and arrow at another man in Nimbin today. About 9am (Wednesday…

Posted by NSW Police Force on Wednesday, March 13, 2019

- Advertisement -

कसा घडला प्रकार 

जखमी इसम एक प्रॉपर्टी बघण्यासाठी आला होता. त्यावेळी तेथे असलेल्या एका माणसाने त्याच्यावर बाणाने हल्ला केला. हल्ला करून या माणसाने घटनास्थळावरून पळ काढला. या हल्लयात बाण त्याच्या मोबाईलला लागला. हा बाण मोबाईलच्या आर पार गेला. मात्र शरीराला लागला नाही. या हल्ल्यातून बचावल्यानंतर त्यांनी पोलिसांकडे याची तक्रार केली. बाण फोन मधून आर पार झाला असला तरी त्यामुळे शरीरावर दुखापद झाली असल्याचे पोलिसांनी सांगितले. जखमी इसमाकडून मिळालेल्या माहितीच्या आधारावर पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -