घरदेश-विदेशमुख्यमंत्री पदासाठी काँग्रेसने राजभवनवर जाऊन राज्यपालांना दिले पत्र

मुख्यमंत्री पदासाठी काँग्रेसने राजभवनवर जाऊन राज्यपालांना दिले पत्र

Subscribe

मनोहर पर्रिकर यांच्या पार्थिवावर आज सायंकाळी ५ वाजता अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. परंतु, त्यांच्या अंत्यसंस्कारापूर्वीच गोव्यातील नवीन मुख्यमंत्री आपल्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत.

रविवारी रात्री गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांचे निधन झाले. त्यानंतर काँग्रेसकडून सत्ता स्थापनेचा दावा करण्यात येत आहे. गोव्यामध्ये भाजपचे बहुमताचे सरकारने नाही, त्यामुळे भाजपच्या हातून सत्ता जाऊ शकते. दरम्यान, काँग्रेसला सत्ता स्थापनेची प्रचंड घाई झाली लागली आहे. काँग्रेसने गोव्याचे राज्यपाल मृदुला सिन्हा यांना दुसऱ्यांदा पत्र लिहून सत्तास्थापनेचा दावा केला आहे. याशिवाय आता काँग्रेस आपल्या १४ आमदारांसोबत राज्यपालांच्या भेटीसाठी राजभवनला दाखल झाले आहे. त्याचबरोबर ‘दुपारी २ वाजेपर्यंत मुख्यमंत्री निश्चित होईल. तर दुपारी ३ वाजता गोव्याचे नवे मुख्यमंत्री शपथ घेतील’, अशी माहिती गोव्याचे भाजप अध्यक्ष विनय तेंडूलकर यांनी दिली आहे.

राज्यपालांनी नाकारली होती भेट

काँग्रेसचे १४ आमदार गोव्याचे राज्यपाल मृदुला सिन्हा यांच्या भेटीसाठी निघाले होते. परंतु, राज्यपालांनी ही भेट नाकारली होती. राज्यापालांची वेळ न घेता काँग्रेस आमदार भेटीसाठी निघाले होते. अखेर काँग्रसेच्या नेते राजभवनला दाखल झाल्यामुळे राज्यपालांनी भेटाला मान्यता दिली. काँग्रेसच्या १४ आमदारांनी राज्यपालांना पत्र  दिले.

- Advertisement -

प्रमोद सावंत यांचे नाव आघाडीवर

गोव्याच्या नव्या मुख्यमंत्री पदासाठी प्रमोद सावंत यांचं नाव आघाडीवर असल्याची माहिती सुत्रांकडून मिळत आहे. त्याचबरोबर विश्वजीत राणे, श्रीपाद नाईक यांचेदेखील नाव आघाडीवर आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -