घरताज्या घडामोडीमनोज तिवारींची उचलबांगडी; आदेश गुप्ता दिल्ली भाजपचे नवे अध्यक्ष

मनोज तिवारींची उचलबांगडी; आदेश गुप्ता दिल्ली भाजपचे नवे अध्यक्ष

Subscribe

कोरोना संकटकाळात भाजपने संघटनेत मोठा बदल केला आहे. दिल्ली भाजपच्या अध्यक्ष पदावरुन मनोज तिवारी यांना हटविण्यात आले आहे. त्यांच्या जागी आता आदेश कुमार गुप्ता यांच्याहातात दिल्ली भाजपची कमान देण्यात आली आहे. पक्षाचे महासचिव अरुण सिंह यांच्याकडून अधिकृत घोषणा करण्यात आली आहे.

भाजपने लॉकडाऊन काळात संघटनेत बदल करण्याचा झपाटा लावल्याचे दिसून येत आहे. दिल्लीसोबत छत्तीसगढचे अध्यक्षांना देखील पदावरुन हटविण्यात आले आहे. त्यांच्याजागी विष्णूदेव साय यांना प्रदेश अध्यक्ष नेमले गेले आहे. मणिपूर राज्याचे देखील अध्यक्ष बदलण्यात आले आहेत. एस टिकेंद्र सिंह यांच्या हातात मणिपूरची जबाबदारी देण्यात आली आहे. राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांच्याकडून या तीनही पदांची घोषणा करण्यात आली.

- Advertisement -

दिल्ली आणि छत्तीसगढ विधानसभा निवडणुकीत भाजपला पराभवाचा सामना करावा लागला होता. दिल्लीत तर आपकडून भाजपला मोठी हार पत्करावी लागली होती. २०१४ आणि २०१९ मध्ये सलग दोनदा लोकसभेला चांगला निकाल लागूनही त्यानंतर आलेल्या दिल्ली विधानसभेत भाजपला दुसऱ्यांदा मोठा पराभव पचवावा लागला होता. त्यामुळे या पराभवाचे खापर मनोज तिवारी यांच्यावर फुटले. तसेच छत्तीसगढमध्येही मागच्या अनेक वर्षांपासूनची सत्ता गमावण्याची नामुष्की भाजपवर आली होती.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -