घरदेश-विदेशअॅमेझॉनमध्ये मेगाभरती; १३०० जागांची रिक्त पदे

अॅमेझॉनमध्ये मेगाभरती; १३०० जागांची रिक्त पदे

Subscribe

बेरोजगार तरुणांसाठी एक आनंदाची बातमी आहे. अॅमेझॉन कंपनी लवकरच भारतात रिक्त जागा भरणार आहे.

सध्या मोठ्या प्रमाणात बेरोजगारी वाढली असल्याने शिक्षण असून देखील बरेच तरुण नोकरीच्या शोधात आहेत. त्यासोबतच सरकारी नोकऱ्या मिळणे देखील कठीण झाले आहे. अशा बेरोजगार तरुणांसाठी एक आनंदाची बातमी आहे. अॅमेझॉन कंपनी लवकरच भारतात रिक्त जागा भरणार आहेत. यामध्ये टेक्नॉलॉजीसह विविध गटांतील पदांचा समावेश असणार आहे.

१३०० जागांची रिक्त पदे

अॅमेझॉनमध्ये भारतात १३०० पदांची मेगाभरती करण्यात येणार असून चीनमध्ये ४६७, जपानमध्ये ३८१, ऑस्ट्रेलियात २५०, न्यूझीलंड १३, दक्षिण कोरिया ७० आणि सिंगापूरमध्ये १७४ जागांची भरती करण्यात येणार आहे. टेक्नॉलॉजीसह विविध गटातील पदांचा भरतीमध्ये समावेश आहे. यामध्ये कंटेंट (प्राइम व्हिडिओ), व्हॉईस असिस्टंट, फूड रिटेल आणि कस्टमर सपोर्ट या पदांचा या समावेश आहे.

- Advertisement -

भारतात ६० हजार कामगारांची भरती

अॅमेझॉनने आतापर्यंत भारतात ६० हजार कामगारांची भरती केलेली आहे. आता यात १० टक्के आणखी वाढ होणार आहे. भारतातील विशेष कौशल्य असलेल्या व्यक्तींना अॅमेझॉनमध्ये सामावून घेण्यासाठी अॅमेझॉनमध्ये पुन्हा एकदा मेगाभरती सुरु केली आहे. भारतातील बंगळुरू, हैदराबाद आणि चेन्नईतील प्रतिभा असणाऱ्या तरुणांना नोकरीत प्राधान्य देणार असल्याचे कंपनीने सांगितले आहे.

या धोरणासंदर्भात अॅमेझॉन केंद्र सरकारशी चर्चा करणार असल्याची माहिती समोर आली आहे. अॅमेझॉनची जगभरात वेबसाइट असून या अंतर्गत पेमेंट्स, ट्रान्स्पोर्टेशन, डिजिटल प्रोडक्ट्स अँड सर्विसेसची सुविधा देण्यात येते त्यामुळे अॅमेझॉनला सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटसाठी तरुण शोधत असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच मशीन शिकणे, क्वालिटी अॅश्यूरेन्स, वेब डेव्हलपमेंट, स्टुडिओ आणि फोटोग्राफी इत्यादी कामासाठी भारतातील तरुणांना नोकरी उपलब्ध करुन देणार आहोत, अशी माहिती कंपनीने दिली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -