ऑनलाईन मागवला कॅमेरा आल्या चपला!

कॅमेरा मागवला आले बुट

ऑनलाईन खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी भरपूर ऑफर दिल्या जातात. चांगल्या ऑफर्स असल्यामुळे ग्राहकही मोठ मोठ्या वस्तूंची खरेदी करतात. मात्र अनेकदा ऑनलाईन वस्तू मागवल्यावर फसवणूक झाल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. Amezon वरून एका व्यक्तीने १.४० लाखांचा कॅमेरा मागवला होता. मात्र प्रत्यक्षात घरी चपला आणि दगड आल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

मिळालेल्या माहितनुसार सुमित चौहान यांनी काही दिवसांपूर्वी ऑनलाईन शॉपिंग करत कॅमेरा मागवला होता. त्यांनी Amezonया शॉपिंग वेबसाईटवरून हा कॅमेरा मागवला. पण ऑर्डर घरी येताच त्यांना धक्काच बसला. कॅमेराचा बॉक्स उघडल्यानंतर त्यांना कॅमेरा ऐवजी जुन्या चपला आणि दगड मिळाले. त्यानंतर त्यांनी एक व्हिडिओ काढून सोशल मीडियावर शेअर केला. हा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

सुमित यांनी २७ ऑगस्टला Amezon वरून क्रेडिट कार्डने १.४० लाखांचा कॅमेरा बुक केला होता. कारण कॅमेरा घरी आला तेव्हा दगड आणि फाटके बुट बघून ते हैराण झाले. बॉक्स उघडतानाच एक व्हिडिओ सुमितने आपल्या ट्विटरअकाऊंटवर शेअर केला आहे. त्यांनी डिलर फोन केला असता डिलरने कॅमेरा पाठवल्याचे सांगितले. त्या नंतर त्यांनी Amezon शी संपर्क साधला. Amezon ने माफी मागून याचा तपास करत असल्याचे कळवले.


हे ही वाचा – Video: कोणाशी पंगा घेणार नाही, वडिलांनी दिली कंगणाला समज!