घरदेश-विदेशकंगना रणौतला केंद्राकडून 'वाय प्लस' दर्जाची सुरक्षा!

कंगना रणौतला केंद्राकडून ‘वाय प्लस’ दर्जाची सुरक्षा!

Subscribe

बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतला केंद्र सरकार ‘वाय प्लस’ दर्जाची सुरक्षा देणार आहे. कंगना गेल्या काही दिवसांपासून वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी कंगनाने मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरसोबत केली होती. शिवाय, मुंबई पोलिसांचा अपमान देखील केला. यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी कंगनावर टीकास्त्र सोडलं. त्यानंतर संजय राऊत आणि कंगना यांच्यात शाब्दिक चकमक झाली. शिवाय, शिवसेनेच्या महिला विभागाने पाय ठेवू देणार असा इशारा दिला होता. या सर्व पार्श्वभूमीवर तिला वाय प्लस दर्जाची सुरक्षा देण्याचा निर्णय केंद्रानं घेतला आहे.

- Advertisement -

मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीर आणि तालिबानशी केलेल्या कंगनावर अनेक स्तरांमधून टीका होत आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनीदेखील कंगनाला खडे बोल सुनावले आहेत. संजय राऊत यांना प्रत्युत्तर देत कंगनाने ९ सप्टेंबरला मुंबईत येत आहे, हिंमत असेल तर रोखून दाखवा, असं खूलं आव्हान कंगनाने शिवसेनेला दिलं. यावरुन कंगनाविरोधात संतापाची लाट उसळी. या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर केंद्राने वाय प्लस दर्जाची सुरक्षा दिली आहे. यावर कंगनाने केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे आभार मानले आहेत. “सध्याची परिस्थिती पाहता काही दिवस मुंबईला जाऊ नको असा सल्ला अमित शाह देऊ शकले असते. मात्र, त्यांनी एका कन्येला दिलेलं वचन पाळलं. आमच्या स्वाभिमानाची आणि आत्मसन्मानाची लाज राखली. जय हिंद” असं ट्विट संजय राऊत यांनी केलं.

- Advertisement -

 

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -