India – China Crisis: अरूणाचलप्रदेश भारताचा नाही तर तिबेटचा भाग – चीन

India -China

दिवसेंदिवस चीन आणि भारतातील तणाव वाढत आहे. भारत आणि चीनदरम्यान सुरू असणाऱ्या सीमावादात चीनकडून आक्रमक भूमिका घेतली जात आहे. अरूणाचल प्रदेशमध्ये चीनच्या सेनेने पाच भारतीयांचे अपहरण प्रकरणामध्ये चीनने म्हटले आहे की, अरुणाचल प्रदेश भारताचा भाग आहे असं आम्ही मानत नाही. अरूणाचल प्रदेश हा दक्षिणेकडील तिबेटचा भाग मानत आलो आहोत.

भारतीय सैनिकांनी एलएसीचे उल्लंघन करून बेकायदेशीरपणे चीनच्या सीमेत प्रवेश केला आणि तेथे तैनात असणाऱ्या सैनिकांना इशारा देण्यासाठी गोळीबार केल्याचा आरोप चीनने केला आहे. आम्ही भारताबरोबर चर्चा करण्याच्या तयारीत होतो असा दावाही चीनने केला आहे.

चीनमधील सरकारी वृत्तपत्र असणाऱ्या ग्लोबल टाइम्सने चिनी लष्कराच्या प्रवक्त्याच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार परिस्थितीचा अंदाज घेऊन चिनी सैनिकांनी हाती काहीच पर्याय उपलब्ध नसल्याने कावाई केली. अपहरण प्रकरणामध्ये केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी ट्विटरवरुन काही प्रश्न उपस्थित केले. त्यानंतरच चीनकडून अरुणाचल संदर्भात हा दावा करण्यात आला आहे.

ग्लोबल टाइम्समधील वृत्तानुसार “चीनने कधीच ‘कथित’ अरुणाचल प्रदेशला मान्यता दिलेली नाही. हा भाग चीनच्या दक्षिण तिबेटचा हिस्सा आहे. या भागामध्ये बेपत्ता झालेल्या पाच भारतीयांसंदर्भात आमच्याकडे विचारपूस करण्यात आली आहे. मात्र त्यांच्याबद्दल आमच्याकडे कोणतीही माहिती नाही.”

रविरावी रात्री केलेल्या एका ट्विटमध्ये रिजिजू यांनी चीनच्या लष्कराचा सहभाग असणाऱ्या या अपहरणा प्रकरणाची माहिती देणारे ट्विट केलं. भारतीय सैन्य हे चीनच्या उत्तराची वाट पाहत आहे. असहं त्यांनी यामध्ये म्हटलं होतं.  “भारतीय लष्कराने पिपल्स लिब्रेशन आर्मीच्या केंद्राला संदेश पाठवला आहे. त्यांच्या उत्तराची वाट पाहत आहोत,” असं रिजिजू यांनी एका पत्रकाराच्या ट्विटला उत्तर देताना म्हटलं होतं.

२९ आणि ३० ऑगस्टच्या रात्रीही दोन्हीकडील सैन्य आमने सामने आल्याचं भारतीय लष्कराने म्हटलं होतं. यामध्ये कोणत्याही सैनिकाला दुखापत झालेली नाही. भारतीय लष्कराने दिलेल्या माहितीनुसार चीनी लष्कराने सीमा भागामध्ये भारतीय प्रदेशात घुसखोरीची तयारी केली होती. मात्र भारतीय लष्कारने सतर्क राहून चीनचा हा इरादा हाणून पाडला.


हे ही वाचा – FAU-G गेमची संकल्पना सुशांतची, कंपनीने दिलं ‘हे’ उत्तर!