घरदेश-विदेशअयोध्या दहशतवादी हल्ला प्रकरण; चौघांना जन्मठेप, एकाची मुक्तता

अयोध्या दहशतवादी हल्ला प्रकरण; चौघांना जन्मठेप, एकाची मुक्तता

Subscribe

२००५ मध्ये अयोद्धेत घडविण्यात आलेल्या दहशतवादी हल्ला प्रकरणातील ४ आरोपींना आजे प्रयागराजच्या विशेष न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली.

रामभक्तांच्या वेशात अयोध्येत शिरून ग्रेनेड हल्ला घडविलेल्या दहशतवाद्यांना आज अखेर शिक्षा सुनावण्यात आली. अयोध्येत २००५ मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ला प्रकरणी चार आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली असून एकाची मुक्तता करण्यात आली आहे. प्रयागराजच्या विशेष न्यायालयाने दिलेल्या या निर्णयात जन्मठेपेची शिक्षा झालेल्या चारही आरोपींना प्रत्येकी ४० हजारांचा दंडही ठोठावण्यात आला आहे.

- Advertisement -

२००५ मध्ये दहशतवाद्यांनी अयोध्येत घडवलेल्या ग्रेनेड हल्ल्यात दोन जण मारले गेले होते. तर काही सुरक्षा रक्षक जखमी झाले होते. या प्रकरणी इरफान, मोहम्मद शकील, मोहम्मद नसीम, मोहम्मद अजीज आणि फारूख यांना अटक करण्यात आली होती. यामध्ये प्रयागराजच्या विशेष न्यायालयाने मोहम्मद अजीजची मुक्तता केली असून इतर चौघांना जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. या प्रकरणात एकूण ६३ साक्षीदारांच्या साक्षी नोंदवण्यात आल्या होत्या. यामध्ये १४ पोलीस कर्मचाऱ्यांनी साक्षी नोंदवल्या होत्या. मागील १४ वर्षांपासून या प्रकरणाची सुनावणी सुरू होती. त्यानंतर न्यायाधीशांनी १८ जून रोजी या प्रकरणाचा निर्णय देण्यात येईल असं सांगितलं होतं. त्यानुसार अयोध्या दहशतवादी प्रकणावर प्रयागराजच्या विशेष न्यायालयाने आज निर्णय दिला.

रामभक्तांच्या वेशात दहशतवादी अयोद्धेत शिरले

२००५ मध्ये अयोद्धेत घडलेल्या दहशतवादी हल्ल्यात दहशतवाद्यांनी रामभक्तांचा वेश केला होता. रामभक्तांच्या वेशात दहशतवादी अयोद्धेत शिरले. त्यानंतर त्यांनी या भागाची रेकी केली. यादरम्यान त्यांनी टाटा सुमो गाडीने प्रवासही केला. हल्ल्यापूर्वी दहशतवाद्यांनी राम मंदिरात जाऊन दर्शन घेतले होते. त्यानंतर रामजन्मभूमी परिसात येताच तेथील सुरक्षेचे कडे तोडून दहशतवाद्यांनी ग्रेनेडचा हल्ला केला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -