घरताज्या घडामोडीबँक ऑफ इंडियामध्ये २१६ पदांसाठी भरती होणार सुरू, कधी आणि केव्हा ते...

बँक ऑफ इंडियामध्ये २१६ पदांसाठी भरती होणार सुरू, कधी आणि केव्हा ते जाणून घ्या

Subscribe

बँक ऑफ इंडियाने विविध भागातील अधिकाऱ्यांच्या एकूण २१६ पदांच्या भरतीची अधिसूचना आज जाहीर केली आहे. त्यामुळे उमेदवार बँकेच्या अधिकृत संकेतस्थळावरील bankofindia.co.in करिअर पेजवर विजिट करून किंवा खालील दिलेले डायरेक्ट लिंकवरील नोटिफिकेशनवरून अधिसूचना डाऊनलोड करू शकतात. या पदांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया १६ सप्टेंबर पासून सुरू होणार आहे.

बँक ऑफ इंडिया २१६ अधिकारी पदांसाठी अधिसूचना डाउनलोड लिंक

- Advertisement -

बँक ऑफ इंडियाची अधिकृत वेबसाइट लिंक

बँक ऑफ इंडियाने नुकतीच अधिकाऱ्यांच्या २१६ पदांसाठी शॉर्ट नोटीस जारी केली आहे. बँक ऑफ इंडियाद्वारे प्रोजेक्ट संख्या २०२०-२१/२ अंतर्गत जाहीर केलेल्या भरतीच्या ऑनलाईन अर्जाची प्रक्रिया १६ सप्टेंबरला सुरू होत आहे. ऑनलाईन अर्ज जमा करण्याची अंतिम तारीख ३० सप्टेंबर निश्चित करण्यात आली आहे.

- Advertisement -

असा भरा ऑनलाईन अर्ज

बँक ऑफ इंडियामध्ये २१६ अधिकारी पदासाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी बँकेच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध झालेला अधिसूचना डाऊनलोड करावी. त्यानंतर पात्रतेच्या निकषांसह सर्व सूचना वाचाव्यात. मग १६ सप्टेंबर रोजी अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध झालेला ऑनलाईन अर्ज संबंधित पदानुसार भरून तो सबमिट करावा. तसेच या संबंधित पदासाठी येणाऱ्या अपडेटसाठी अधिकृत संकेतस्थळावर लक्ष ठेवणे गरजेचे आहे. या भरतीबाबत सोशल मीडियावर आलेल्या दिशाभूल करणारे अर्ज भरू नये. तसेच यासाठी पैसे मोजू नये. अर्ज प्रक्रियेची संपूर्ण माहिती बँक ऑफ इंडिया अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध करून दिली जाईल.


हेही वाचा – मराठा आरक्षणाला स्थगितीमुळे अकरावी प्रवेशप्रक्रिया लांबणीवर


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -