बिहारमध्ये उष्णतेची लाट; तीन दिवसात १४८ जणांचा मृत्यू

नितीश सरकारने राज्यामध्ये सर्व सरकारी आणि खासगी शाळांना २२ जूनपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान, गयामध्ये १४४ कलम लागू करण्यात आले आहे.

Bihar
bihar heat stroke
बिहारमध्ये उष्णतेची लाट

बिहारमध्ये भीषण उष्णतेची लाट पसरली आहे. उष्माघातामुळे आतापर्यंत १४८ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. सोमवारी नवादा जिल्ह्यामध्ये ५ आणखी लोकांचा मृत्यू झाला. बिहारमध्ये रविवारी ७७ आणि शनिवारी ६६ लोकांचा मृत्यू झाला. उष्णतेची लाट पाहता गयामध्ये १४४ कलम लागू करण्यात आला आहे. दिवसाला रस्त्यावर गर्दी करुन उभे राहण्यास बंदी घालण्यात आली आहे. तर, नितीश सरकारने राज्यामध्ये सर्व सरकारी आणि खासगी शाळांना २२ जूनपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान, हवामान खात्याने राज्यामध्ये पुढच्या दोन त तीन दिवसामध्ये उष्णता कमी होईल असा अंदाज वर्तवला आहे.

गयामध्ये १४४ कलम लागू

नालंदाच्या पावापुरी मेडिकल कॉलेजमध्ये सोमवारी ५ जणांचा मृत्यू झाला. रुग्णालयाचे अधिक्षक ज्ञान भूषण यांनी सांगितले की, उष्माघाताचा त्रास होत असलेल्या ५८ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. दुसरीकडे प्रशासनने गया जिल्ह्यामध्ये १४४ कलम लागू केले आहे. यामध्ये दिवसाला (सकाळी ११ ते दुपारी ४ वाजपर्यंत) लोकांनी कुठेच गर्दी करुन उभे राहण्यास बंदी घातली आहे. यावेळी सर्वच प्रकारच्या ठिकाणावर गर्दी करण्यास मनाई करणयात आली आहे.

औरंगाबादमध्ये प्रत्येक तासाला एकाचा मृत्यू

औरंगाबाद जिल्ह्यामध्ये उष्णाघातामुळे दोन दिवसामध्ये ६३ जणांचा आणि गयामध्ये ३४ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. औरंगाबादमध्ये रविवारी अनेक रुग्ण उपचारासाठी दाखल झाले. प्रत्येक तासाला एका रुग्णांचा मृत्यू होत होता. लागोपाठ रुग्णालयामध्ये रुग्णांची रांग लागत राहिली आणि एकापाठोपाठ एकाचा मृत्यू होत गेला. रविवारी नवादामध्ये १७, पटणामध्ये ११, बक्सरमध्ये ७ आणि आरामध्ये ५ जणांचा मृत्यू झाला.

पटणामध्ये सर्वात जास्त तापमानाची नोंद

रविवारी बिहारमधील पटणा शहरामध्ये सर्वात जास्त तापमानाची नोंद झाली. पटणामधील तापमान ४५ अंश डिग्री सेल्सिअस आहे. जे शनिवारच्या तुलनेमध्ये ०.८ डिग्रीने कमी आहे. तर दुसरीकडे गयामध्ये ४४.४ अंश डिग्री सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. भागलपूर ४१, मुजफ्फरपूर ४२.६ डिग्री सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. रविवारी आपत्ती व्यवस्थापन विभागाने औरंगाबाद, नवादा आणि गयाचा दौरा केला. रुग्णालयामध्ये एसी आणि पंख्यासोबतच कूलर लावण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या जिल्ह्यांमध्ये गर्मीमुळे आजारी पडलेले रुग्ण शरीराची आग होत असल्याची तक्रार घेऊन रुग्णालयात येत आहेत. दरम्यान, रुग्णालयातील सर्व कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्या असून पटणावरुन कर्मचाऱ्यांच्या टीमला रवाना करण्यात आले.

बिहारमधील मृतांचा आकडा

औरंगाबाद – ६३

नवादा – २५

पटणा – १४

गया – ३४

बक्सर – ७

आरा – ६

एकूण – १४८

हेही वाचा –

बिहारमध्ये चमकी तापाने घेतला ६४ चिमुकल्यांचा बळी