घरदेश-विदेशबिहारमध्ये महिलेला मारहाण करत विवस्त्र धिंड काढली

बिहारमध्ये महिलेला मारहाण करत विवस्त्र धिंड काढली

Subscribe

बिहारमधील भोजपूर जिल्हयात महिलेला मारहाण करत विवस्त्र धिंड काढल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी 360 जणांवर गुन्हा दाखल कऱण्यात आला असून 15 जणांना अटक करण्यात आली आहे.

बिहारमधील भोजपूर जिल्ह्यामध्ये धक्कादायक घटना घडली आहे. भरदिवसा एका महिलेला विवस्त्र करुन तिला मारहाण केली. त्यानंतर पीडित महिलेला मारहाण करत गावभर धिंड काढली. एका विद्यार्थ्याचा मृतदेह रेल्वे ट्रॅकवर सापडला होता. या हत्याचा आरोप पीडित महिलेवर लावत जमावाने पीडित महिलेला मारहाण करुन विवस्त्र केले आणि गावभर धिंड काढली. याप्रकरणी ३६० जणांविरोधात गुन्हा दाखल करत पोलिसांनी १५ जणांना अटक केली आहे.

हत्येचा आरोप लावत महिलेला केली मारहाण

सोमवारी बिहीया रेल्वे स्टेशनजवळ २० वर्षाच्या विमलेश शहा या विद्यार्थ्याचा मृतदेह सापडला होता. ही माहिती कळताच विमलेशच्या बहिणीचा हार्ट अटॅकने मृत्यू झाला. विमलेशच्या हत्येमागे पीडित महिलेच्या कुटुंबाचा हात असल्याचा आरोप करत गावकऱ्यांनी महिलेला विवस्त्र करून मारहाण केली. त्यानंतर त्यांनी गावभर या महिलेची धिंड काढली.

- Advertisement -

८ पोलिसांना केले सस्पेंड केले

या घटनेप्रकरणी बिहिया पोलीस ठाण्यातील ८ पोलिसांना सस्पेंड करण्यात आले आहे. ही घटना ज्यावेळी घडली त्यावेळी घटनास्थळावर पोलीस देखील उपस्थित होते. मात्र त्यांनी जमावाला रोखण्याचा प्रयत्न केला नाही. त्यामुळे या पोलिसांना सस्पेंड करण्यात आले आहे.

घरांना आणि गड्यांना लावली आग

पीडित महिला ज्या भागामध्ये राहते त्याठिकाणी संतप्त झालेल्या जमावाने तोडफोड करत पाच घरांना आग लावली. यावेळी त्यांनी अनेक गाड्यांना पेटवून दिले. या भागामध्ये राहणाऱ्या इतर लोकांच्या घरामध्ये घुसून महिलांना आणि त्यांच्या मुलांना बाहेर काढले. त्यानंतर त्यांनी पीडित महिलेच्या घरात घुसून तिला मारहाण केली. त्यानंतर विवस्त्र करुन तिची गावभर धिंड काढली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -