घरCORONA UPDATEजागतिक कोरोना अपडेटCoronaVaccine : बिल गेट्स यांचं मोठं पाऊल, गरिबांना १० कोटी डोस देण्यासाठी...

CoronaVaccine : बिल गेट्स यांचं मोठं पाऊल, गरिबांना १० कोटी डोस देण्यासाठी सीरमसोबत करार!

Subscribe

कोरोनाचं संकट जगभरात वाढतच असताना दुसरीकडे त्याच्या व्हॅक्सिनसाठी जगभरात १०० हून अधिक संस्था प्रयत्न करताना दिसत आहेत. या पार्श्वभूमीवर ऑक्सफर्ड विद्यापीठाने भारतातील सीरम इन्स्टिट्युटसोबत लस उत्पादनासाठी करार केला आहे. या लसीची सध्या मानवी चाचणी सुरू असून त्याचे निष्कर्ष समाधानकारक आहेत. या पार्श्वभूमीवर जगातल्या सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत पहिल्या स्थानावर असलेले गेट्स फाऊंडेशनचे बिल गेट्स यांनी सीरम इन्स्टिट्युटसोबत करार केला आहे. बिल आणि मेलिंडा गेट्स फाऊंडेशनने (Bill & Melinda Gates Foundation) सीरम इन्स्टिट्युटकडून (Serum Institute of India) तयार केल्या जाणाऱ्या लसीचे १० कोटी डोस भारत आणि जगभरातल्या गरीब राष्ट्रांना उपलब्ध करून देण्यासंदर्भात हा करार केला आहे. त्यामुळे कोरोनावरच्या लसीचं उत्पादन करण्यासाठी मोठं बळ मिळणार असून गरिबांना परवडणाऱ्या दरात लस उपलब्ध होऊ शकणार आहे.

- Advertisement -

अमेरिकेतील मॉडेर्ना (Moderna) लसीसोबतच ऑक्सफर्ड लस यशस्वी होण्याकडेही सगळ्याचं लक्ष लागलं आहे. या दोन्ही लसींचे निकाल संशोधकांचा उत्साह वाढवणारे आहेत. सीरमचे प्रमुख पुनावाला यांनी सांगितल्याप्रमाणे जर लसीच्या मानवी चाचणीचे सर्व टप्पे यशस्वी झाले, तर नोव्हेंबरपर्यंत ही लस (COVID19 vaccine) बाजारात येऊ शकेल. पुनावाला यांनी देखील याआधी भारतीयांना ही लस माफक दरामध्ये उपलब्ध करून देण्याचं आश्वासन दिलं आहे. या पार्श्वभूमीवर बिल गेट्स यांनी केलेला हा करार लसीची किंमत अजूनच कमी ठेवण्यात मोलाची भूमिका बजावू शकतो.

रशिया आणि अमेरिकेत लसीसाठी स्पर्धा

दरम्यान, एकीकडे अमेरिकेतील मॉडेर्ना आणि ऑक्सफर्ड-सीरम (Oxford) यांच्या लसीच्या अजून चाचण्याच सुरू असताना रशियाने मात्र लस बाजारात आणण्याची पूर्ण तयारी करून टाकली आहे. रशियातील संशोधन संस्थेने तयार केलेली लस यशस्वी झाली असून १० ऑगस्टपर्यंत ही लस बाजारात आणता येईल, असा दावा रशियन सरकारमधील अधिकारी, नेते करत आहेत. त्यामुळे नक्की कोणती लस आधी बाजारात येणार, याविषयी रशिया आणि अमेरिका यांच्यात स्पर्धाच लागल्याचं चित्र निर्माण झालं आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -