घरदेश-विदेशलष्करात भरती न झाल्याने तरुणाची फेसबुक लाईव्ह करत आत्महत्या

लष्करात भरती न झाल्याने तरुणाची फेसबुक लाईव्ह करत आत्महत्या

Subscribe

सलग पाच वेळा परीक्षा देवूनही मुन्ना कुमारला लष्करात भरती होता आले नाही, म्हणून त्याने फेसबुकवर लाईव्ह करत आत्महत्या केली.

भारतीय लष्करात भरती होण्यासाठी अनेक प्रयत्न करुनही भरती न झाल्यामुळे एका २४ वर्षीय तरुणाने आत्महत्या केली आहे. भारतीय लष्करात भरती होण्यासाठी ५ वेळा प्रयत्न करूनही यश न आल्याने त्याने हे पाऊल उचलल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे आत्महत्या करण्याचा त्याचा हा निर्णय त्याने फेसबुकवर लाईव्ह सांगितला. फेसबुकवर १ मिनिट ९ सेकंद तो लाईव्ह होता जवळपास २७५० लोक हे लाईव्ह पाहत होते पण एकानेही त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला नाही किंवा त्याच्या घरच्यांना कळवले नाही.

मुन्ना कुमार असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव असून तो आग्रा शहरात शांतीनगर या भागात राहत होता. त्याने बीएससीमधून ग्रॅज्युएशन पूर्ण केले होते. पण भारतीय लष्करात भरती न होवू शकल्याने तो खूप निराश झाला होता. बुधवारी सकाळी फेसबुकवर लाईव्ह करत आपण आत्महत्या करत असल्याचे स्पष्ट करत त्याने आत्महत्या केली.
तरुणाने सहा पानांची सुसाईड नोट लिहिली असून आपल्या आत्महत्येसाठी आपणच जबाबदार असल्याचे म्हटले आहे. भारतीय लष्करात भरती होऊ न शकल्याने तसेच आई-वडिलांची अपेक्षा पूर्ण न करु शकल्याने आपण आत्महत्या करत असल्याचे मुन्नाने लिहिले आहे.

- Advertisement -

देशसेवेचे वेड

कुटुंबियांकडून मिळालेल्या माहितीनुसार मुन्ना ‘भगतसिंग’ यांच्यापासून खूपच प्रेरीत झाला होता म्हणूनच भारतीय लष्करात नोकरी करुन देशसेवा करण्याची त्याची ईच्छा होती पण सलग पाच वेळा परीक्षा देवूनही त्याला भरती होता आले नाही. म्हणूनच त्याने आत्महत्या केली असल्याचे समोर आले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -