घरदेश-विदेशपाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन; गोळीबारात दोन जवान शहीद

पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन; गोळीबारात दोन जवान शहीद

Subscribe

जम्मू - काश्मीरच्या तांगधर सेक्टरमध्ये पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन करुन गोळीबार करण्यात आला असून या गोळीबारात दोन जवान शहीद झाले असून एका नागरिकाचा मृत्यू झाला आहे. तर तीन जण जखमी झाले आहेत.

जम्मू काश्मीरमधून कलम ३७० रद्द केल्यानंतर पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन सुरु आहे. पाकिस्तानने बारामुल्लातील उरी सेक्टरमध्ये शस्त्रसंधीचे उल्लंघन केल्याची घटना ताजी असताना आज पुन्हा एकदा जम्मू काश्मीरच्या कुपवाडा जिल्ह्यातील तांगधर सेक्टरमध्ये पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन करुन गोळीबार करण्यात आला. या गोळीबारात तांगधर सेक्टरमध्ये तैनात असलेले दोन जवान झाले असून एका नागरिकाचा मृत्यू झाला आहे. तर तीन नैगरिक जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. भारतीय सुरक्षा दलाकडून या गोळीबाराला चोख प्रत्युत्तर देण्यात येत आहे.

- Advertisement -

दहशतवादी घुसखोरीच्या तयारीत

पाकव्याप्त काश्मीरमधून ५०० दहशतवादी भारतात घुसखोरीच्या तयारीत असल्याची माहिती भारतीय लष्कराच्या उच्चाधिकाऱ्यांनी दिली आहे. दरम्यान, पॉक मधल्या नियंत्रण रेषेजवळ विविध प्रशिक्षण शिबिरांमध्ये ५०० दहशतवादी जम्मू काश्मीरमध्ये घुसखोरीची संधी शोधत असल्याचे समोर आले आहे.

५ पाकिस्तानी सैनिक ठार

भारतीय लष्कराच्या जवानांनी केलेल्या कारवाईत ४ ते ५ पाकिस्तानी सैनिक ठार झाले असल्याची माहिती समोर आली आहे. तर १० हून अधिक दहशतवाद्यांना भारतीय जवानांनी कंठस्नान घातले असून अनेक जण जखमी झाले आहेत.

- Advertisement -


हेही वाचा – प्रियंका गांधींची परखड टीका, ‘कॉमेडी सर्कस बंद करा, अर्थव्यवस्था सुधारा’!


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -