घरदेश-विदेशमजूर, शेतकर्‍यांना मदत केली नाही तर आर्थिक आपत्ती येईल - राहुल गांधी

मजूर, शेतकर्‍यांना मदत केली नाही तर आर्थिक आपत्ती येईल – राहुल गांधी

Subscribe

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कॉंग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या अध्यक्षतेखाली विरोधी पक्षांची बैठक घेण्यात आली. या बैठकीत २२ पक्षांचे नेते सहभागी होते.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कॉंग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या अध्यक्षतेखाली समविचारी विरोधी पक्षांची बैठक सुरू आहे. सभेच्या सुरूवातीस चक्रीवादळ अम्फानमध्ये प्राण गमावलेल्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यानंतर सोनिया गांधी यांनी बैठक सुरू केली. बैठकीत विरोधी पक्षांनी केंद्र सरकारला त्वरित अम्फान चक्रीवादळ राष्ट्रीय आपत्ती म्हणून जाहीर करण्याचं आवाहन केले आणि या आपत्तीच्या परिणामाचा सामना करण्यासाठी बाधित राज्यांना मदत देण्याची मागणी केली.

चक्रीवादळा संदर्भात विरोधी पक्षांनी असं आवाहन केलं आहे की यावेळी मदत आणि पुनर्वसन सर्वात महत्त्वाचं प्राधान्य असलं पाहिजे. परंतु अशा आपत्तीमुळे इतर रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता देखील दुर्लक्षित करून चालणार नाहीत. विरोधी पक्षांनी केंद्र सरकारला नागरिकांना तातडीने मदत देण्याचं आवाहन केलं आहे.

- Advertisement -

meeting_052220035836.jpg

कॉंग्रेसचे प्रवक्ते रणदीपसिंग सुरजेवाला म्हणाले की, राहुल गांधींनी विरोधी नेत्यांना संबोधित केलं. बैठकीत राहुल गांधी म्हणाले की लॉकडाऊनची दोन उद्दिष्टे आहेत. रोगाला रोखणं आणि येत्या रोगाचा सामना करण्याची तयारी. परंतु आज संक्रमण वाढत आहे आणि आम्ही लॉकडाऊन उघडत आहोत. याचा अर्थ असा आहे का लॉकडाऊनचा निर्णय विचार न करता निर्णय घेण्यात आला म्हणून परिणाम चांगले आले नाहीत? लॉकडाऊनमुळे कोट्यावधी लोकांचं प्रचंड नुकसान झाल्याचं राहुल गांधी म्हणाले. जर आज त्यांना मदत केली नाही, त्यांच्या खात्यात ७,५०० रुपये पाठवले नाहीत, जर त्यांना रेशन दिलं नाही, प्रवासी कामगार, शेतकरी आणि लघु उद्योगांना मदत केली नाही तर आर्थिक आपत्ती येईल.

- Advertisement -

हेही वाचा – Coronavirus Updates: रुग्ण दुप्पट होण्याचा दर १३.३ दिवस, रिेकवरी रेट ४१ टक्के – आरोग्य मंत्रालय


ममता बॅनर्जींची बैठकीला उपस्थिती

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीही या बैठकीला हजेरी लावली. दोन्ही मुख्यमंत्र्यांनी आपला मुद्दा सांगितल्यावर लगेच बैठकीतून रजा घेतली. उद्धव ठाकरे आणि ममता बॅनर्जी दुसऱ्या बैठकीला जाणार होते म्हणून त्यांनी रजा घेतली.

कोण-कोण बैठकीला उपस्थित होतं?

सोनिया गांधी यांच्या नेतृत्वात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून झालेल्या बैठकीत २२ पक्षांचे नेते सहभागी होते. आरजेडीच्या वतीने आरजेडीचे राज्यसभेचे खासदार मनोज झा, आरएलएसपी अध्यक्ष उपेंद्र कुशवाहा, माकपचे डी राजा, शरद यादव, आरजेडीचे तेजस्वी यादव, नॅशनल कॉन्फरन्सचे ओमर अब्दुल्ला, बिहारचे माजी मुख्यमंत्री जीतनराम मांझी, एन. के. प्रेमचंद्रन, जयंतसिंग, बद्रुद्दीन अजमल, राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल, शरद पवार, शिवसेनेचे संजय राऊत यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते. या बैठकीत लोकसभेतील कॉंग्रेस नेते अधीर रंजन चौधरीही उपस्थित होते. कॉंग्रेसने बोलविलेल्या राजकीय पक्षांच्या बैठकीत सपा आणि बसपा तसंच आपने देखील सहभाग घेतला नाही.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -